केसांना दही लावू शकतो का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

सार

काहीजण हेल्दी आणि मऊसर केसांसाठी दह्याचा वापर केला जातो. पण याचा केसांसाठी वापर करणे फायदेशीर आहे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

Curd Benefits : बहुतांश महिलांना लांबसडक आणि काळेभोर केस वाढवणे आवडते. पण सध्याची बिघडलेली लाइफस्टाइल पाहता त्याचा केसांवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. काही महिलांमध्ये केस कोरडे होणे किंवा फ्रिजी होण्यासारखी समस्या उद्भवते. अशातच केसांना मऊसरपणा येण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. पण काहीजण घरगुती उपाय करतात.

केसांच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय म्हणून दह्याचा वापर करू शकता. दह्यामध्ये प्रोटीन आणि काही पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अशातच दह्याचा हेअर मास्क केसांना लावल्याने काय फायदे होतात. पण फायद्यासह काहीवेळेस नुकसानही होऊ शकते.याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

केसांना दही लावण्याचे फायदे
 दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक ॲसिड असते, यामुळे केसांना मऊसरपणा आणि चमक येण्यास मदत होते. दह्यामध्ये प्रोटीन भरपूर असल्याने केसांची वाढ होऊ शकते. याशिवाय केस मूळांपासून मजबूत देखील असतात. दह्यामधील अँटी-बॅक्टेरियल गुण मूळांना येणारी खाज आणि इन्फेक्शनची समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

केसांना लावण्याचे नुकसान 
केस अधिक तेलकट असल्यास दह्याचे वापर केल्याने अधिक तेलकट होऊ शकतात. अत्याधिक तेल केसांसंबंधित समस्यांचे कारण ठरू शकते. काहींना अॅलर्जीही होऊ शकते. याशिवाय पहिल्यांदाच दह्याचा वापर करणार असाल तर पॅच टेस्ट नक्की करा. एवढेच नव्हे दह्याचा केसांसाठी अत्याधिक वापर केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते.

असा तयार करा हेअर मास्क 

हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये दही घ्या. यामध्ये अंड देखील मिक्स करू शकता. जेणेकरुन केसांना अधिक पोषण मिळण्यास मदत होईल. दह्याचा हेअर मास्क केसांना 15-20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस मऊसर होण्यास केसांना चमक येईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Share this article