Plants for Good Luck : नव्या वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी घरात लावा हे रोप

Published : Dec 11, 2023, 10:44 AM ISTUpdated : Dec 11, 2023, 02:47 PM IST
Vastu Tips

सार

Vastu Tips: वास्तुशास्रात अशा काही रोपांबद्दल सांगितले आहे, जी घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. या रोपांच्या सकारात्मक प्रभावामुळे परिवारातील मंडळींचे नशीब पालटले जाते. जाणून घेऊया या रोपांबद्दल अधिक...

Lucky Plants for prosperous: प्रत्येक व्यक्तीला वाटते आपण श्रीमंत असावे. यासाठी तो फार मेहनतही करतो. पण काहीवेळेस खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. हातात पैसा टिकून राहत नाही किंवा सतत अपयशच येते. व्यक्तीला कळत नाही आपल्या अपयशामागील नक्की कारण काय आहे. यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. 

नव्या वर्षात अडचणींचा सामना करता येऊ नये आणि हे वर्ष उत्तम जाण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. घराच्या आणि तुमच्या सुख-समृद्धीसाठी वास्तुशास्रातनुसार पुढील काही रोप घरी लावल्यास तुमचे भाग्य बदलले जाऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

मनी प्लांट
वास्तुशास्रानुसार, मनी प्लांटमुळे आर्थिक दृष्ट्या लाभ होतात. मनी प्लांटची पानं ही यशाचे प्रतीक मानले जातात. हे एक सदाबाहर रोप आहे. नव्या वर्षात मनी प्लांटचे रोप घरात लावू शकता. यामुळे घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहिल.

तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्रानुसार, घरात योग्य दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा निर्माण होतात. याचसोबत संपूर्ण परिवारावरील संकट दूर होतात. याशिवाय घरात तुळशीचे रोप लावल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वादही मिळतात.

चमेली
चमेलीचे रोप घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. चमेलीच्या फुलांमध्ये घरातील सदस्यांचे विचार सकारात्मक होतात. याशिवाय घरातील मंडळींचा आत्मविश्वास वाढला जातो.

बांबू
बांबूचे रोप बहुतांशजण आपल्या घरात, ऑफिसमध्ये अथवा अभ्यासाच्या टेबलावर ठेवणे पसंत करतात. वास्तुशास्रानुसार बांबूचे रोप हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नव्या वर्षात घराच्या सुख-समृद्धीसाठी तुम्ही बांबूचे रोप ठेवा. तसेच बांबूचे रोप हे दीर्घायुष्याचेही प्रतीक आहे.

क्रासुला प्लांट
वास्तुशास्रात, क्रासुला प्लांटला विशेष महत्त्व आहे. याचे रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मक उर्ज दूर होते आणि सकारात्मक उर्जा वाढली जाते. आर्थिक समस्यांचा सामना करत असल्यास क्रासुलाचे प्लांट घरात लावू शकता.याशिवाय क्रासुला प्लांटमुळे कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतात आणि नोकरी-व्यवसायात यश मिळते.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

आणखी वाचा:

Vastu Tips : किचनमधील ही भांडी पालथी ठेवणे मानले जाते अशुभ

Money Attraction Tips: आर्थिक तंगीचा सामना करताय? नव्या वर्षात करा हे उपाय, होईल धनलाभ

50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं

PREV

Recommended Stories

भारतातील सर्वाधिक Romantic Honeymoon Destinations, नव्या वर्षात पार्टनरसोबत या फिरून
Browser Extension : ब्राउजर एक्सटेंन्शन वापरताना रहा सावध, 40 लाख युजर्सला उद्भवलाय धोका