प्रवासानंतर पोट बिघडलेय? फॉलो करा या 4 टिप्स

प्रवास करणे बहुतांशजणांना पसंत असते. पण प्रवासानंतर काहींना पोटासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. यावर उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Travelling Tips : लांब पल्ल्याचा प्रवास केल्यानंतर बहुतांशजणांना पचनासंबंधित समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. खरंतर, या प्रवासावेळी सातत्याने एकाच जागेवर बसल्याने पोटावर दबाव पडला जातो. यामुळेच बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या उद्भवली जाऊ शकते. याशिवाय प्रवासादरम्यान खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. जाणून घेऊया प्रवासानंतर पोट दुखत असल्यास कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल सविस्तर...

दररोज त्रिफळाचे सेवन करा

त्रिफळाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय प्रवासापूर्वी आणि नंतरही त्रिफळा चुर्णाचे सेवन करावे.

हलक्या पदार्थांचे सेवन करावे

प्रवासावेळी हेव्ही पदार्थ किंवा तेलटकट, तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे अपचनाची समस्या उद्भवली जाऊ शकते. प्रवासानंतरही हलक्या स्वरुपातील पदार्थांचे सेवन करावे. याचा गट हेल्थला फायदा होतो.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या

गट हेल्थ उत्तम राहण्यासाठी अधिकाधिक पाणी प्यावे. प्रवासादरम्यान बहुतांशजण कमी पाणी पितात. यामुळे ब्लोटिंग आणि अपचनाची समस्या उद्भवते.

चालणे फार महत्वाचे

प्रवासानंतर आपल्या डेली रुटीनमध्ये वर्कआउटचा समावेश करा. यामुळे पचनक्रिया सुधारली जाईल. प्रत्येक वेळी काही खाल्ल्यानंतर चालण्याची सवय लावा. यामुळे गट हेल्थ उत्तम राहिल आणि पचनासंबंधित समस्या दूर होतील.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

मकरसंक्रातीला लागणारी भोगीची भाजी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या

महिलांच्या 6 समस्यांवर रामबाण उपाय आहे हे तेल, असा करा वापर

Share this article