संक्रातीच्या आधल्या दिवशी भोगीची भाजी आवर्जून केली जाते. लहानपणी डब्याला हीच भाजी आवर्जून दिली जायची.
सुरुवातीला भाज्या छोट्या करून तुकडे उकळून घ्या. त्यानंतर कढईत तूप गरम करून मोहरी, जिरे, हळद आणि हिंगेला फोडणी द्या.
फोडणीत भाज्या, तिखट, मीठ, गुळ घालून हलवा. त्या भाज्यांमधील सर्व मिश्रण एकजीव करा.
शेंगदाण्याचा कूट टाकून चांगले शिजवून घ्या. वरून खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर शिंपडून ठेवा. त्यानंतर भाजी सर्व्ह करून घ्या.
गरमागरम भाजी सर्व्ह करून जेवायला घ्या. आपल्याला या भाजीचा स्वाद नक्कीच आवडेल.