Beauty Tips In Marathi : केसांशी संबंधित समस्या असतील तर सर्वजण त्यातून झटपट सुटका व्हावी, यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात. काहीजणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या व केमिकलयुक्त ट्रीटमेंट करतात तर काही लोक घरच्या घरी नैसर्गिक उपाय करण्यावर भर देतात. पण नैसर्गिक उपाय देखील कशा पद्धतीने करायचे? याची योग्य माहिती नसल्याने केसांचे नुकसानच अधिक होते.
आयुर्वेदातील औषधी व नैसर्गिक वनस्पतींचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. केसांसाठी यापैकीच एक बहुगुणी नैसर्गिक उपाय म्हणजे कढीपत्त्याची पाने. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे.
या इवल्याशा पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटी- ऑक्सिडेंट्स, अँटी- बॅक्टेरिअल व बीटा कॅरेटीन यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ज्यामुळे केस घनदाट, लांबसडक व सुंदर होण्यास मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याच्या पानांपासून आपण कोणकोणते हेअर पॅक तयार करू शकता, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…