Bhaubeej 2023 : भाऊबीजेला घराच्या प्रवेशद्वारासमोर व पाटाभोवती अशी काढा सुंदर रांगोळी VIDEO

Bhaubeej 2023 : भाऊबीज सण दणक्यात साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. हा सणात आनंदाचे आणखी रंग भरण्यासाठी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर सुंदर रांगोळी नक्की काढा. 

 

Harshada Shirsekar | Published : Nov 14, 2023 10:51 AM IST / Updated: Nov 14 2023, 05:12 PM IST

17

भारतीय संस्कृती घराच्या प्रवेशाद्वारासमोर (Ragoli Design), अंगणात, चौरंग तसेच पाटाभोवती रांगोळी (Patabhovtichi Rangoli) काढण्याचे विशेष महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात महिला पहाटे स्नान केल्यानंतर सर्वप्रथम दारासमोर सुंदर रांगोळी काढायच्या. पण हल्ली धकाधकीच्या जीवनात केवळ सण-समारंभापुरतीच (Diwali 2023) रांगोळी काढली जाते. 

भाऊबीज (Bhaubeej 2023 In Marathi ) सणाच्या दिवशी ओवाळणीसाठी भाऊरायाला बसायला मांडलेल्या पाटाभोवतीही रांगोळी (Rangoli Design In Marathi) काढायची परंपरा आहे. तर यंदा केवळ दारासमोरच नव्हे तर पाटाभोवतीही सुंदर रंगीबेरंगी रांगोळी नक्की काढा. त्यासाठी आपण या सोप्या डिझाइनची मदत घेऊ शकता.

27

आर्टिस्टने या रांगोळीमध्ये छोटी बहीण आपल्या भावाला ओवाळत असल्याची रांगोळी काढली आहे. पिवळ्या रंगाच्या रांगोळीने 'भाऊबीज' हा शब्द अनोख्या पद्धतीने लिहिला आहे. आर्टिस्टने रांगोळी काढून त्यात रंग भरण्यापूर्वी जमिनीवर खडूने चित्र रेखाटलं, आपणही तशीच पद्धत वापरावी.

37

अतिशय साधी - सोपी अशी ही रांगोळी आहे. यामध्ये आर्टिस्टने वर्तुळ काढून त्यामध्ये पिवळ्या रंग भरला आहे. त्यावर हिरव्या रंगाच्या रांगोळीने 'भाऊबीज' असे लिहिलं आहे. वर्तुळाभोवती कमळाचे डिझाइन ठेवून त्यावर दिवे लावले आहेत.

47

रांगोळीचे हे डिझाइन पाहिल्यानंतर तुमच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. या रांगोळीमध्ये बहीण आपल्या दादाला कुंकवाचा टिळा लावतेय तर दादा बहिणीसाठी आलेली भेटवस्तू लपवत असल्याचे दिसत आहे.

57

भारतीय संस्कृतीमध्ये घराच्या प्रवेशद्वारासमोर व चौरंग तसेच पाटाभोवतही (Patabhovtichi Rangoli Design) रांगोळी काढण्याची परंपरा आहे. भाऊबीज सण साजरा करताना यंदा पाटाभोवती नक्की रांगोळी काढा.

67

पाटाभोवती रांगोळी काढण्यासाठी (Patabhovti Rangoli) आपण फुलांचा व फुलांच्या पाकळ्यांचा, पानांचाही वापर करू शकता. 

77
Share this Photo Gallery
Recommended Photos