Sugar Free नाश्तावेळी खा हे 3 फूड्स, रहाल हेल्दी

Published : Apr 16, 2025, 09:00 AM IST

Sugar free breakfast : सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नये असे म्हटले जाते. अन्यथा दिवसभर थकवा जाणवतो. सकाळचा नाश्ता केल्याने मेटाबॉलिज्म वाढणे, शुगर कंट्रोल करणे ते एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. 

PREV
17
सकाळचा नाश्ता

सकाळच्या नाश्तानंतर संपूर्ण दिवस उत्साही राहण्यास मदत होते. खरंतर, सकाळची सुरुवात आपण कोणत्या फूड्सने करतो यावर आपले आरोग्य निर्भर असते. पण नाश्तामध्ये गरजेपेक्षा अधिक साखरेचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

27
पाकिटबंद फूड टाळा

गोड ब्रेड, पाकिटबंद फूड्स आणि चहा-कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. याचा हळूहळू आरोग्यावर प्रभाव पडला जातो. अत्याधिक साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, थकवा आणि मूड स्विंग्ससारख्या समस्या होऊ शकता. अशातच सकाळचा नाश्ता शुगर फ्री करण्यासाठी काय खावे हे जाणून घेऊ...

37
प्रोसेस्ड आणि पाकिटबंद फूड टाळा

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या खाण्यापिण्याचा आरोग्यावर फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते. अशातच सकाळच्या नाश्तामध्ये ब्रेड, पाकिटबंद ब्रेकफास्ट किंवा फ्लेवर्सयुक्त दह्याचे सेवन करणे टाळावे. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

47
असा करा नाश्ता

सकाळच्या नाश्तामध्ये ओट्स, उपमा, भाज्या घालून केलेले पोहे किंवा उपमा, बेसन चीला, पराठा अथवा मल्टीग्रेनचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण फार कमी असते.

57
हेल्दी ड्रिंक्स

बहुतांशजणांना सकाळी उपाशी पोटी गोड चहा-कॉफी किंवा पाकिटबंद फ्रुट ज्यूस पिण्याची सवय असते. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. 100 टक्के नैसर्गिक फ्रूट ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. पण फायबर नसतात. अशातच सकाळी चहा-कॉफीएवजी ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, लिंबू पाणी, नारळाचे पाणी प्यावे.

67
ज्यूस नव्हे फळांचे सेवन करा

काहीजण हेल्दी नाश्ता म्हणून ज्यूस पितात. पण ज्यूसएवजी फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यावेळी फळांचा ज्यूस काढला जातो तेव्हा त्यामधील फायबर निघून जातात आणि केवळ साखर राहते. याशिवाय ज्यूस लवकर पचला जात नाही. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढू शकतो.

77
प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता

सकाळच्या नाश्तामध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पोट भरलेले राहते. सकाळच्या नाश्तामध्ये कार्बोहाइड्रेट्सयुक्त डाएटचे सेवन केल्याने लवकर भूक लागते. याशिवाय गोड खाण्याची क्रेविंग होते. अशातच मूग डाळीचा चीला, अंड किंवा भाज्या घालून केलेले पोहे, उपमा यांचे सेवन करावे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories