रक्षाबंधनावेळी चेहऱ्यावर ग्लो हवाय? वापरा या 5 घरगुती टिप्स

Raksha Bandhan 2024 : चेहऱ्यावर चिकटल्या जाणाऱ्या धूळ आणि मातीसह उन्हामुळे त्वचा काळवंडली जाते. अशातच रक्षाबंधनावेळी ग्लोइंग त्वचेसासाठी किचनमध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करू शकता. याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.

Chanda Mandavkar | Published : Aug 16, 2024 8:36 AM
15
चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी सोपे उपाय

रक्षाबंधनाची सध्या सर्वत्र जोरदार सुरु झाली आहे. या दिवशी महिला सुंदर दिसण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. महिला कपडे ते मेकअपच्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतात. अशातच कडक ऊन आणि त्वचेवर माती, घाण चिकटून त्वचा काळवंडली असल्यास पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करण्याएवजी घरच्याघरीच काही उपाय करु शकता. जाणून घेऊया काळवंडलेल्या त्वचेवर ग्लो आणण्यासाठी सोपे घरगुती उपाय सविस्तर...

25
कोरफड, हळद आणि मधाचा फेस पॅक

कोरफड, हळद आणि मध या तीन वस्तू त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. यापासून फेक पॅक तयार करण्यासाठी 3 चमचे कोरफडचा गर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे मध मिक्स करुन चेहऱ्याला लावा. हा पॅक चेहऱ्याला 10-15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला ग्लो येईल आणि टॅनिंगची समस्या कमी होईल.

35
हळद आणि दूध

काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही हळद आणि दूधाची पेस्ट लावू शकता. यामुळे त्वचा कोमल आणिग ग्लो होण्यास मदत होईल.

45
मुल्तानी माती आणि एलोवेरा जेल

मुल्तानी माती आणि एलोवेरा जेलच्या मास्कमुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होईल. याशिवाय त्वचेमधील अत्याधिक तेल, घाण आणि डेड सेल्स निघण्यास मदतही होईल. हा पॅक चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

55
बटाटा

चेहऱ्यावरील टॅनिंग, डार्क सर्कल आणि डागांची समस्या कमी करण्यासाठी बटाट्याचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते. यासाठी बटाट्याचा रस किंवा किसलेला बटाटा चेहऱ्याला लावून ठेवा. 10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. बटाट्यामुळे देखील चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधानंतर हातातून राखी काढताना चुकूनही करू नका या चुका

रक्षाबंधनानंतर या 3 राशींच्या समस्यांमध्ये होणार वाढ, धन हानिचीही शक्यता

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos