रक्षाबंधनानंतर या 3 राशींच्या समस्यांमध्ये होणार वाढ, धन हानिचीही शक्यता
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपल्या स्थितीत परिवर्तन करतो. यामुळे राशींवर विशेष प्रभाव पडतो. अशातच यंदाच्या रक्षाबंधनानंतर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन भावाबहिणीच्या अतूट नात्यामधील प्रेम दर्शवणारा सण आहे. यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. पण यंदाच्या रक्षाबंधनानंतर काही राशींच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे. याशिवाय कुंभ राशीसह अन्य काही राशींना धन हानिचा सामना करावा लागू शकतो.
26
देव गुरु मृगशीर्षा नक्षत्रात प्रवेश करणार
रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑगस्टला देव गुरु संध्याकाळी मृगशीर्षा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्रानुसार, देव गुरुंच्या बदलल्या जाणाऱ्या स्थितीमुले काही राशींच्या आयुष्यात चढउतार येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया रक्षाबंधनानंतर कोणत्या राशींच्या आयुष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे याबद्दल सविस्तर...
36
वृषभ राशी
देव गुरुंच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील व्यक्तींना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय नोकर वर्गातील व्यक्तीला देखील कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागण्याी शक्यता आहे. तुमचे व्यक्तीमत्व मलील होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावही वाढू शकतो.
46
तुळ राशी
तुळ राशीला देव गुरुंच्या नक्षत्र परिवर्तनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूक करण्यापासून तुळ राशीच्या व्यक्तींनी दूर रहावे. दांपत्याच्या आयुष्यात तणाव वाढण्यासह मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
56
कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्तींना रक्षाबंधनानंतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन व्यापार, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसाय ठप्प होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. गुंतवणूक केलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील व्यक्तींसाठीही 28 ऑगस्टपर्यंतचे दिवस ठिक नसणार आहेत. जुने आजारपण मागे लागण्याची शक्यता आहे.
66
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.