Kitchen Hacks : भाजी खारट झाली? टेन्शन नका घेऊ! या सोप्या टिप्सने मिनिटांत चव आणा परत!

Published : Aug 21, 2026, 10:53 PM IST

Kitchen Hacks: स्वयंपाक करताना भाजीमध्ये चुकून मीठ जास्त पडलंय? आता ती भाजी फेकून देण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मिनिटांत भाजीची चव पुन्हा छान करू शकता.

PREV
110
मीठ जास्त झालं? उपाय आहेत की!
स्वयंपाक झाल्यावर भाजीची चव घेतली आणि मीठ जास्त झाल्याचं कळलं की सगळा मूड जातो ना? पण आता काळजी करू नका. भाजी खारट झाली म्हणून फेकून देण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही भाजीतील खारटपणा कमी करून तिला आणखी चविष्ट बनवू शकता. चला तर मग, पाहूया हे उपाय कोणते आहेत.
210
१. कच्चा बटाटा:

रस्सा भाजीमध्ये कच्च्या बटाट्याच्या मोठ्या फोडी टाका आणि १०-१५ मिनिटं भाजी शिजू द्या. बटाट्यामधील स्टार्च भाजीतील पाण्यासोबत अतिरिक्त मीठही शोषून घेतो. भाजी सर्व्ह करण्यापूर्वी बटाट्याच्या फोडी काढून टाका.

310
२. कणकेचे गोळे:

चपातीसाठी मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करून ते उकळत्या रश्श्यात सोडा. हे गोळे भाजीतील अतिरिक्त मीठ आणि पाणी पटकन शोषून घेतात. जेवायला वाढण्यापूर्वी हे गोळे बाहेर काढा.

410
३. लिंबाचा रस किंवा व्हिनेगर:

आंबटपणामुळे मिठाची तीव्रता कमी होते. भाजी खारट झाल्यास त्यात लिंबाचे काही थेंब किंवा थोडं व्हिनेगर घाला. यामुळे खारटपणा पूर्णपणे जात नाही, पण त्याची चव जिभेला जाणवत नाही.

510
४. दही किंवा साय:

रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास दोन चमचे फेटलेलं दही किंवा फ्रेश क्रीम (साय) घाला. यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो आणि भाजीला छान दाटपणा आणि क्रीमी चव येते.

610
५. साखर किंवा मध:

तिखट किंवा मसालेदार भाजीत मीठ जास्त झाल्यास चिमूटभर साखर किंवा मधाचे काही थेंब टाका. यामुळे भाजीला किंचित गोडवा येतो आणि मीठ-तिखटाचा समतोल साधला जातो.

710
६. सुकी भाजी खारट झाल्यास:

जर रस्सा भाजीऐवजी सुकी भाजी (उदा. भेंडी, बटाट्याची भाजी) खारट झाली, तर त्यात आणखी थोड्या चिरलेल्या भाज्या घालून परता. यामुळे भाजीचं प्रमाण वाढेल आणि मीठ आपोआप बॅलन्स होईल.

810
७. नारळाचं दूध:

नॉन-व्हेज ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात घट्ट नारळाचं दूध घाला. यामुळे खारटपणा कमी होतो आणि भाजीला एक छान रिच चव येते.

910
८. टोमॅटो प्युरी:

ताज्या टोमॅटोची प्युरी किंवा थोडा टोमॅटो सॉस घातल्यास त्यातील नैसर्गिक आंबट-गोड चवीमुळे मिठाचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते.

1010
९. शिजवलेला भात:

बटाटा किंवा कणीक उपलब्ध नसल्यास, मऊ शिजवलेल्या भाताचा एक छोटा गोळा थेट रश्श्यात टाकून ५ मिनिटे उकळवा आणि नंतर काढून टाका. भात अतिरिक्त मीठ सहज शोषून घेतो. तर पुढच्या वेळी तुमच्या घरात भाजी खारट झाली, तर घाबरून न जाता तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यानुसार हे हॅक्स नक्की ट्राय करून बघा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories