Marathi

यंदा रक्षाबंघनाला भावाला बांधा स्वतः बनवलेली राखी; पाहा सोप्या आयडिया

Marathi

यंदा भावाला बांधा स्वतः बनवलेली राखी

रक्षाबंधन जवळ आलंय. यंदा भावाला स्वतःच्या हाताने बनवलेली राखी बांधा. यासाठी काही सोप्या आयडियाज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Image credits: INSTAGRAM
Marathi

रंगबिरंगी टिकल्यांपासून बनवा राखी

घरात असलेल्या रंगीबेरंगी टिकल्या वापरून तुम्ही सुंदर राखी बनवू शकता. एक छोटा गोल कार्डबोर्डचा तुकडा घ्या. त्याच्याभोवती या रंगीत टिकल्या चिकटवा. 

Image credits: INSTAGRAM
Marathi

कलर स्टोन्सने द्या फॅन्सी लूक

तुम्हाला फॅन्सी राखी बनवायची असेल तर रंगीबेरंगी खडे आणि मोती वापरा. एक जाड कागद किंवा कार्डबोर्ड गोल आकारात कापून घ्या. त्याच्या मध्यभागी एक मोती आणि आजूबाजूला रंगीत खडे चिकटवा.

Image credits: INSTAGRAM
Marathi

पांढऱ्या खड्यांनी वाढवा चमक

राखी कोणत्याही रंगाची असो, त्यावर पांढरे खडे वापरल्यास डिझाइन जास्त उठून दिसतं. रंगीत बेसवर पांढऱ्या खड्यांची बॉर्डर लावा किंवा मध्यभागी सजावट करा. 

Image credits: INSTAGRAM
Marathi

मोत्यांनी बनवा सिंपल आणि क्युट राखी

पांढऱ्या मोत्यांनी बनवलेली राखी दिसायला खूप सुंदर दिसते. लाल किंवा तुमच्या आवडीच्या रंगाच्या धाग्यामध्ये मोती ओवून घ्या. मध्यभागी सजवलेला भाग घट्ट चिकटवला की तुमची राखी तयार.

Image credits: INSTAGRAM
Marathi

हँड एम्ब्रॉयडरीवाली राखी

राखी आणखी सुंदर बनवायची असेल, तर हँड एम्ब्रॉयडरी राखी हा एक उत्तम पर्याय आहे. एका छोट्या गोल बेसवर रंगीत कापड गुंडाळा आणि त्यावर तुम्ही आधीच तयार केलेली एम्ब्रॉयडरी चिकटवा.

Image credits: INSTAGRAM

Coffee Benefits : रोज एक कप कॉफी प्या, मिळतील हे ६ जबरदस्त फायदे

Hair Clips : क्षणात तुमचा लूक बदलणाऱ्या सुंदर हेअर ॲक्सेसरीज

Bangle Designs : साडी आणि लेहंग्यावर उठून दिसतील बांगड्यांच्या या लेटेस्ट डिझाइन्स

Blouse Designs : साडीवर उठून दिसतील हे लेटेस्ट बॅक नेक डिझाइन्स, पाहा खास फोटो