Monsoon Tips : पावसाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्यावी? वाचा खास टिप्स, रहाल सुरक्षित

Published : Aug 18, 2025, 10:49 AM IST

पावसाळा हा आनंददायी ऋतू असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. रस्त्यांवर पाणी साचणे, अपघाताची शक्यता वाढणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि आरोग्यविषयक त्रास उद्भवणे या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होतो.

PREV
15
घरातून बाहेर पडताना खबरदारी

मुसळधार पावसात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. जर बाहेर जाणे आवश्यक असेल तर छत्री, रेनकोट, वॉटरप्रूफ बूट यांचा वापर करावा. ओल्या कपड्यांमुळे सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पावसात भिजल्यास त्वरित कपडे बदलून कोरडे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल फोन वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवणे सुरक्षित ठरते.

25
रस्त्यांवरुन चालताना घ्या काळजी

पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचते आणि खड्डे दिसेनासे होतात. त्यामुळे पायी चालताना किंवा वाहन चालवताना विशेष दक्षता घ्यावी. शक्य असल्यास ओळखीचे आणि सुरक्षित रस्तेच वापरावेत. वाहन चालवताना वेग कमी ठेवावा आणि सिग्नल तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. पाण्यात बुडलेल्या रस्त्यांवर वाहन नेणे टाळावे, कारण त्यामुळे अपघात किंवा वाहन बंद पडण्याची शक्यता वाढते.

35
आरोग्याची काळजी

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रो अशा आजारांचा धोका जास्त असतो. डासांपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये. पिण्याचे पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करूनच प्यावे. बाहेरचे कच्चे आणि अर्धवट शिजलेले अन्न टाळावे. पावसाळ्यात भिजल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत आणि कोरडे ठेवावेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि गरम पेये सेवन करावीत.

45
घर आणि सुरक्षिततेसाठी उपाय

मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरणे, वीज खंडित होणे किंवा भिंती ओलसर होणे सामान्य आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यासाठी टॉर्च, बॅटरी, मेणबत्त्या तयार ठेवाव्यात. इलेक्ट्रॉनिक उपकरणे विजेच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घरातील पाणी निचरा व्यवस्थेची नियमित साफसफाई करणेही महत्त्वाचे आहे.

55
मानसिक आरोग्याची काळजी

सततच्या पावसामुळे प्रवासात अडचणी, घराबाहेर जाण्यात अडथळे आणि वीजपुरवठ्याच्या समस्या यामुळे मनावर ताण येऊ शकतो. अशा वेळी कुटुंबासोबत वेळ घालवणे, पुस्तक वाचन, हलकेफुलके व्यायाम किंवा योगाभ्यास केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.

Read more Photos on

Recommended Stories