मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या. त्यानुसार दिवसाचे नियोजन करा.
अडकलेली कामे गतीमान होतील. त्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणीत होईल. वैयक्तिक कामे सोडवा. त्यांची अडसर होऊ देऊ नका. कामात एकाग्रता वाढेल. कोणतेही काम दुर्लक्ष करू नका. आळख हा माणसाचा शत्रू आहे हे लक्षात ठेवा. घरातील वातावरण आनंदी राहील.
29
अंक २:
नातेवाईकांमुळे आनंद वाढेल. कुटुंब आणि नातेवाईक ही माणसाची संपत्ती आहे. ती योग्य प्रकारे उपयोगात आणा. अनोळखींवर विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. समस्या दूर होतील. पण त्यामुळे अतिआत्मविश्वास होऊ देऊ नका.
39
अंक ३:
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये दिवस जाईल. त्यामुळे आठवड्यातील जबाबदाऱ्या कमी होतील. पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. हे मतभेद योग्य प्रकारे हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. बँकेच्या कामात सावधगिरी बाळगा.
घाई न करता कामे पूर्ण करा. मुलांची तब्येत बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. धीर आणि शांतता राखा. पोटाच्या समस्या होऊ शकतात. जेवणाकडे लक्ष द्या. संतुलीत जेवण ठेवा. बाहेरचे खाणे टाळा.
59
अंक ५:
आध्यात्मिक कामात दिवस जाईल. श्रावण सोमवार असल्याने घरात धार्मिक वातावरण राहिल. आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. सामाजिक कार्यात रस वाढेल. त्यामुळे मित्रपरिवारात वाढ होईल. त्यांच्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल.
69
अंक ६:
दिवस चांगला जाईल. घशाची समस्या येऊ शकते. सध्या पाऊस येत असल्याने आरोग्याच्याही समस्या होऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याही कामात घाई करू नका. शिक्षणाची आवड वाढेल. एखादे पुस्तक हातात पडेत. त्यात मन रमेल.
79
अंक ७:
दिवस चांगला जाईल. शारीरिक थकवा येऊ शकतो. व्यवसायात अडचणी येतील. वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. मानसिक शांती मिळेल. मानसिक श्रीमंत राहिला तर पैशांची श्रीमंती सहज तुम्हाला मिळेल. त्यादिशेने प्रयत्न करा.
89
अंक ८:
दिवस व्यस्ततेत जाईल. मार्केटिंगमध्ये रस वाढेल. प्रवास टाळा. भावांशी संबंध चांगले राहतील. कुटुंबिक सहवास लाभेल. मन प्रसन्न राहिल. त्यामुळे दिवस चांगला जाईल.
99
अंक ९:
दिवस चांगला जाईल, मन आनंदी राहील. आत्मदर्शनातून नवीन जीवन सापडेल. व्यवसायात मंदी येऊ शकते. पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. महिलांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.