Rose Day 2025 : आयुष्यातील गुलाबासारख्या व्यक्तीला पाठवा हे खास संदेश

Rose Day 2025 : येत्या 7 फेब्रुवारीपासून व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होणार आहे. याच दिवशी रोझ डे ही साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील खास व्यक्तीला गुलाबासह मनातील भावना व्यक्त करणारे खास संदेश पाठवा. 

Rose Day 2025 Wishes : फेब्रुवारीचा महिना प्रत्येक कपल्ससाठी खास असतो. कारण व्हेलेंटाइन डे पूर्वी सुरु होणाऱ्या व्हेलेंटाइन वीकची प्रत्येकाकडून आवर्जुन वाट पाहिली जाते. या वीकमध्ये येणाऱ्या प्रत्येक नव्या डे वेळी नवा दिवस साजरा केला जातो. येत्या 7 फेब्रुवारी पासून व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होण्यासह याच दिवशी रोझ डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी गुलाबाचे फुलं देऊन आयुष्यातील खास व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. रोझ डे निमित्त पुढील काही खास संदेश, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा द्या.

माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला “Happy Rose Day”

लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…. “Happy Rose Day”

मला प्रेमात हरायचं अथवा जिंकायचं नाही, फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे. “Happy Rose Day”

गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते.”Happy Rose Day”

जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही, तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत “Happy Rose Day”

तू कविता असशील तर मला शब्द व्हायचं आहे, तुला मिळवायचं नाही, आयुष्यभर तुझं व्हायचं आहे. “Happy Rose Day”

आणखी वाचा : 

Rose Day 2025 : गुलाबी की लाल? गुलाबाच्या रंगावरुन ओखळा अर्थ

Chocolate Day 2025 : पार्टनरसाठी तयार करा चॉकलेट्सच्या या 5 रेसिपी

Read more Articles on
Share this article