Rose Day 2025 : गुलाबी की लाल? गुलाबाच्या रंगावरुन ओखळा अर्थ
Lifestyle Feb 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pexels
Marathi
रोझ डे 2025
येत्या 7 फेब्रुवारीपासून व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होत आहे. याच दिवशी रोझ डे साजरा केला जाणार आहे. अशातच गुलाबाच्या रंगांवरुन पार्टनरला नक्की काय सांगायचेय हे जाणून घेऊया.
Image credits: freepik
Marathi
लाल गुलाब
लाल रंग प्रेमाचा, रोमांन्सचे प्रतीक मानले जाते. एखाद्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगातील गुलाब दिले जाते.
Image credits: Social media
Marathi
पिवळ्या रंगातील गुलाब
पिवळा रंग मैत्री, आनंदाचे प्रतीक आहे. एखाद्यासोबत घट्ट मैत्री करायची असल्यास पिवळे गुलाब द्या. याशिवाय नव्या नात्याची सुरुवात करायची असल्यासही या रंगाचे गुलाब देऊ शकता.
Image credits: adobe stock
Marathi
गुलाबी रंगातील गुलाब
गुलाबी रंग कोमलता, कृतज्ञता आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. आपल्या भावना पार्टनरला विनम्रपणे सांगण्यासाठी गुलाबी रंगातील गुलाब दिले जाते.
Image credits: adobe stock
Marathi
जांभळ्या रंगातील गुलाब
जांभळ्या रंगातील गुलाबाचा अर्थ एखाद्यावर पाहताच क्षणी प्रेम झाल्याचे दर्शवते. यामुळे रोझ डे निमित्त आवडत्या व्यक्तीला जांभळ्या रंगातील गुलाब देऊ शकता.
Image credits: freepik
Marathi
नारंगी रंगातील गुलाब
नारंगी गुलाब उर्जा, उत्साहाचे प्रतीक आहे. आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला या रंगाचे गुलाब देतात. याशिवाय एखाद्या व्यक्तीबद्दल सखोल भावना, आकर्षण असल्यासही हे गुलाब देऊ शकता.
Image credits: social media
Marathi
पांढऱ्या रंगातील गुलाब
पांढऱ्या रंगातील गुलाब नवी सुरुवात, सौम्यतेचे प्रतीक मानले जाते. या रंगाचे गुलाब आध्यात्मिक संबंध आणि लग्नावेळी दिले जाते. नव्याने मैत्री करायची असल्यासही पांढरे गुलाब देऊ शकता.
Image credits: social media
Marathi
काळ्या रंगातील गुलाब
काळ्या रंगातील गुलाब एखाद्या गोष्टीचा शेवट किंवा बदल दर्शवते. सर्वसामान्यपणे शोक किंवा एखाद्यापासून लांब जाण्याचे हे संकेत आहेत.