रंगपंचमीच्या दिवशी रंगांची मुक्तपणे उधळण केली जाते. पण रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे त्वचा, केस नव्हे फुफ्फुसांचे देखील नुकसान होऊ शकते. यंदाच्या रंगपंचमीला आरोग्याची कशी काळजी घ्याल याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Ranga Panchami 2024 : रंगांची उधळण करणारा सण रंगपंचमी येत्या 25 मार्चला साजरा केला जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या रंगांमधील रंगांची मुक्तपणे उधळण करण्यासह एकमेकांना रंग लावत सण साजरा करतात. पण रंगपंचमीचा सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा त्वचा, केस नव्हे फुफ्फुसासबंधित समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया रंगपंचमीच्या रंगांपासून कशी घ्याल काळजी याबद्दल सविस्तर...
फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतात रंग बाजारात मिळणाऱ्या रंगपंचमीच्या रंगांमध्ये बहुतांशवेळा केमिकल्स, मेटल्स, काचांचे तुकडे आणि किटकनाशकांचा वापर केला जातो. खरंतर केमिकलयुक्त रंगांमुळे आरोग्याला नुकसान पोहोचले जाते. याशिवाय रंगपंचमीच्या रंगांमध्ये शीस वापरले जाते, जे खासकरुन लहान मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवतता. क्रोमिअम आणि पारा अस्थमा आजार आणि अॅलर्जीचे कारण ठरण्यासह किडनी आणि फुफ्फुसांवरही परिणाम करतो.
रंगपंचमीला अशी घ्या काळजी
रंगपंचमीसाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांएवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा. यासाठी तुम्ही फुल किंवा भाज्यांचा वापर करू शकता.
नैसर्गिक रंग त्वचा आणि आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या निर्माण करत नाहीत. पण केमिकलयुक्त रंगांमुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते.
रंगपंचमी खेळताना नाक आणि तोंड मास्क अथवा स्कार्फने झाका. यावेळी नाकातोंडात रंग जाणार नाही याची काळजी घ्या.
रंगांपासून होणाऱ्या प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी घरात पुरेसे वेंटिलेशन असू द्या.
योगाभ्यास किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजच्या मदतीने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारले जाते.
रंगपंचमीला अल्कोहोलचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे फुफ्फुसासंबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते. याशिवाय वेळोवेळी मर्यादित प्रमाणात किंवा मद्याचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो.
तुम्हाला श्वास घेण्यास समस्या निर्माण होत असल्यास, खोकला किंवा छाती जड झाल्यासारखी वाटत असल्यास तातडीने डॉक्टरांना भेटा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.