राम यंत्रावर स्थापन केली जाणार रामललांची मूर्ती, जाणून घ्या यंत्राबद्दल अधिक
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. पण रामललांची मूर्ती ज्यावर स्थापन केली जाणार आहे त्या राम यंत्राबद्दल तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Chanda Mandavkar | Published : Jan 18, 2024 3:28 PM / Updated: Jan 18 2024, 03:33 PM IST
राम यंत्रावर स्थापन होणार रामललांची मूर्ती
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी राम यंत्रावर रामललांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. अशातच जाणून घेऊया राम यंत्राबद्दल अधिक....
राम यंत्र
ज्योतिष शास्रात यंत्रांचे विशेष महत्त्व आहे. यंत्र ही एखाद्या विशेष पूजा किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठी वापरली जातात. राम यंत्र देखील यापैकी एक असून याचे विशेष महत्त्व आहे.
राम यंत्राची डिझाइन
राम यंत्र चौकोनी आकाराचे असते. ज्यावर आठ कमळाच्या पाकळ्या असून त्यावर काही खास मंत्र लिहिलेले आहेत. याशिवाय राम यंत्राच्या चहूबाजूंना विशेष मंत्रही आहेत.
राम यंत्राच्या मध्यभागी असलेल्या त्रिकोणाचे महत्त्व
राम यंत्रामध्ये आठ पाकळ्या असून त्यामध्ये सहा त्रिकोणही आहेत. ज्यामध्ये काही विशेष शब्दांत लिहिलेले आहे. याशिवाय यंत्राच्या मध्यभागी ‘रा रामाय नम:’ असा मंत्र लिहिला आहे. राम यंत्राला 'राम रक्षा यंत्र' देखील म्हटले जाते.
भोजपत्रावर तयार केले जाते राम यंत्र
राम यंत्र भोजपत्रावर तयार केले जाते. यासाठी डाळिंबाच्या झाडाचे कलम, केशरच्या शाईचा वापर केला जातो. राम यंत्र तयार केल्यानंतर यंत्र सिद्ध (Active) केले जाते.
कुठे खरेदी कराल?
आजकाल मार्केटमध्ये पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानात वेगवेगळ्या धातूंमधील राम यंत्र तुम्हाला खरेदी करता येईल. राम यंत्राची घरात स्थापना करण्याआधी त्याचे शुद्धीकरण आणि विशेष पूजा केली जाते.
राम यंत्राचे फायदे
घरात राम यंत्र लावल्याने आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात. याशिवाय घरात सुख-समृद्धी कायम राहते. पैशांची चणचण भासत नाही आणि वेगवेगळ्या समस्यांपासून तुम्ही दूर राहाता.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)