Instant Curd : फक्त १ तासात बनवा घट्ट आणि मलाईदार दही! जाणून घ्या ही सोपी ट्रिक

Published : Oct 13, 2026, 09:15 AM IST

आपण रात्री दुधाला विरजण लावतो आणि सकाळी दही तयार होतं. दही लागायला साधारण पाच ते सहा तास लागतात. पण एका खास ट्रिकने तुम्ही फक्त एका तासात घरच्या घरी घट्ट दही बनवू शकता.

PREV
14
दहीचे महत्व

भारतीय जेवणात दह्याला खूप महत्त्व आहे. ताटात कितीही पदार्थ असले तरी शेवटी दह्यासोबत दोन घास खाल्ले नाहीत, तर जेवण अपूर्ण वाटतं. त्यामुळे अनेक जण रोज घरी दही लावतात. पण दही लागायला पाच-सहा तास किंवा रात्रभर वेळ लागतो. थंडीच्या दिवसांत तर दही नीट लागत नाही आणि त्याला पाणी सुटतं. पण एका सोप्या ट्रिकने तुम्ही फक्त एका तासात दुधाचं घट्ट दही बनवू शकता. घाईच्या वेळी किंवा विरजण लावायला विसरलात, तर ही ट्रिक खूप कामी येईल.

24
साहित्य:

१ लिटर दूध (फुल क्रीम दूध उत्तम) आणि २ चमचे दही.

कृती: सर्वात आधी एका पातेल्यात दूध चांगलं उकळून घ्या. दूध उकळल्यावर गॅस बंद करा आणि ते थोडं थंड होऊ द्या. दूध खूप गरम किंवा पूर्ण थंड नसावं. बोट बुडवल्यावर चटका बसणार नाही, इतकं कोमट दूध हवं. दही चांगलं लागण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता या कोमट दुधात दोन चमचे दही घाला आणि रवी किंवा चमच्याने चांगलं फेटून घ्या. एक-दोन मिनिटे दूध चांगलं ढवळा, जेणेकरून विरजण सगळीकडे एकसारखं लागेल.

34
कृती

विरजण लावलेल्या दुधाच्या भांड्यावर झाकण ठेवा. आता एक प्रेशर कुकर घ्या, त्यात थोडं पाणी घाला आणि दुधाचं भांडं आत ठेवा. कुकरचं झाकण बंद करा आणि १२ ते १५ मिनिटे मंद आचेवर ठेवा. कुकरची शिट्टी काढायला विसरू नका. कुकरमधल्या उष्णतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि दही लवकर लागतं. एका तासानंतर तुम्ही कुकरचं झाकण उघडून पाहिल्यास, तुम्हाला पनीरसारखं घट्ट आणि मलाईदार दही तयार झालेलं दिसेल. याची चवही अगदी अप्रतिम लागते.

44
फ्रिजची ट्रिक:

कुकरमधून दह्याचं भांडं बाहेर काढल्यावर ते लगेच एक तास फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दही हॉटेलसारखं एकदम घट्ट होईल. पाण्यासारख्या पातळ दुधाऐवजी फुल क्रीम दूध वापरलं, तर दह्यावर छान मलाई येते आणि ते खूप घट्ट लागतं. आता विरजण लावायला विसरलात तरी टेन्शन नाही. फक्त ही कुकरची ट्रिक वापरा आणि घरच्या घरी मस्त घट्ट दही एन्जॉय करा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories