आपल्या स्वयंपाकघरात लवंग हमखास असते. भाज्या आणि बिर्याणीची चव वाढवण्यासाठी आपण तिचा वापर करतो. पण लवंग फक्त चवच वाढवत नाही, तर अनेक आजारांवर ती रामबाण उपाय म्हणून काम करते. रात्री झोपताना एका छोट्या कपड्यात लवंग बांधून उशीखाली ठेवली, तर काय फायदे होतात?
23
सर्दीपासून आराम
पावसाळा आणि हिवाळ्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, औषधांशिवाय तुम्ही लवंगेच्या मदतीने यावर मात करू शकता. उशीखाली लवंग ठेवून झोपल्यास सकाळी सर्दीचा त्रास कमी होतो.
गाढ झोप आणि मानसिक शांतता...
लवंगेमध्ये 'युजेनॉल' (Eugenol) नावाचा घटक असतो. याच्या सुगंधामुळे आपल्या मज्जातंतूंना आराम मिळतो. रात्रीच्या वेळी हा सुगंध घेतल्याने दिवसभराचा ताणतणाव कमी होऊन मन शांत होते. परिणामी, कोणतीही चिंता न सतावता गाढ झोप लागते.
33
डास आणि कीटक राहतात दूर:
रात्री कितीही काळजी घेतली तरी डासांमुळे झोपमोड होतेच. लवंगेचा उग्र वास डास आणि लहान कीटकांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे उशीखाली लवंग ठेवल्यास ती नैसर्गिक रिपेलेंटसारखे काम करते. यामुळे डास जवळ फिरकत नाहीत आणि तुम्ही शांत झोपू शकता.
पॉझिटिव्ह एनर्जी..
फक्त आरोग्यासाठीच नाही, तर वास्तूशास्त्र आणि पारंपरिक मान्यतेनुसारही लवंगेला खूप महत्त्व आहे. उशीखाली लवंग ठेवल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वाईट स्वप्ने पडत नाहीत, असे मानले जाते. यामुळे मनात सकारात्मक विचार येतात.
चांगला सुगंध आणि शांत झोप मिळवण्यासाठी हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे आजच रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या कपड्यात लवंग बांधून उशीखाली ठेवा... आणि स्वतः बदल अनुभवा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.