Pregnancy Tips : पावसाळ्यात प्रेग्नेंट महिलांनी चुकूनही करू नका या चुका, लक्षात ठेवा या गोष्टी

Published : Jun 25, 2025, 05:00 PM IST

Mumbai : पावसाळा हा आनंददायक ऋतू असला, तरी प्रेग्नेंट महिलांसाठी तो काही अंशी आव्हानात्मक ठरतो. वातावरणातील बदल, सतत बदलणारे तापमान, सर्दी-खोकल्याचा त्रास, पाण्यात घसरण्याचा धोका, संसर्गजन्य रोग यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

PREV
16
पावसात भिजणे टाळा

काही वेळा पावसात चालताना किंवा अचानक पाऊस आल्यास महिला भिजतात आणि तेच कपडे अंगावर ठेवतात. ओले कपडे त्वचेला चिकटतात आणि त्यामुळे सर्दी, त्वचारोग किंवा युरीन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसात भिजल्यास शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घालावेत.

26
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे

पावसाळ्यात सर्दी, ताप किंवा अंगदुखी झाली तर काहीजण सरळ पॅरासिटामॉल घेऊन टाकतात. गर्भावस्थेत कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते.

36
निसरड्या रस्त्यांवरुन चालणे

पावसात रस्ते आणि जिने घसरट होतात. गर्भवती स्त्रीसाठी घसरून पडणे ही गंभीर समस्या ठरू शकते. योग्य ग्रिप असलेले स्लिपर घालणे, हळू चालणे आणि खडबडीत रस्ते टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

46
फास्ट फूड खाणे टाळा

पावसात विकतचे पदार्थ, फेरीवाल्यांचे अन्न, चाट वगैरे गोष्टींमुळे फूड पॉयझनिंग, डायरिया किंवा टायफॉइड होऊ शकते. गर्भवती महिलांनी अशा अन्नापासून दूर राहावे आणि नेहमी घरचे स्वच्छ, ताजे अन्न खावे.

56
मच्छरदाणीचा वापर करावा

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. गर्भवती महिलांनी मच्छरदाणीचा वापर करावा, अंग झाकणारे कपडे घालावेत, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मच्छर विरोधी क्रीम वापरावे.

66
पुरेशी झोप आणि विश्रांती न घेणे

पावसात वातावरण आलस निर्माण करतं, पण काही स्त्रिया त्या काळात घरकाम, प्रवास इ. करत राहतात. थकवा आणि ताण गर्भासाठी हानिकारक ठरू शकतो. पुरेशी विश्रांती आणि झोप घेणे अत्यावश्यक आहे.

Read more Photos on

Recommended Stories