सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येका आपल्या हेल्थकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे झटपट व कमी वेळात वजन कमी कसे करायचे याचा प्रयत्न बहुतांशजण करतात. वजन कमी करणे सोपे काम नाही. जाणून घेऊया जिम आणि डाएटच्या आधारे वजन कमी करण्यासाठी टिप्स.
वजन कमी करणे ही नियोजनपूर्वक गोष्ट आहे, जी मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असते – योग्य आहार (डाएट) आणि नियमित व्यायाम (जिम). अनेक लोक केवळ एक गोष्ट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण यशस्वी आणि शाश्वत वजन घटवण्यासाठी या दोघांचा समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे. जिममध्ये नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलोरीज बर्न होतात, स्नायू बळकट होतात आणि शरीर अधिक अॅक्टिव्ह होण्यास मदत होते.
25
जिम केल्याने होणारे फायदे
दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्म रेट वाढतो, यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः कार्डिओ प्रकारचे व्यायाम – जसे ट्रेडमिलवर धावणे, सायकलिंग, झुंबा केल्याने शरीरावरील चरबी कमी करण्यात मदत होते. तसेच वेट ट्रेनिंगच्या माध्यमातून स्नायूंना मजबूती मिळण्यासह शरीर टोन्ड होण्यास मदत होते. काहीजण HIIT (High Intensity Interval Training) सारख्या व्यायामांचे काही प्रकार करून झटपट आणि कमी वेळात वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.
35
डाएटकडे लक्ष द्या
जिमला जरी आपण प्राधान्य दिलं, तरीही योग्य आहाराशिवाय वजन कमी होणे कठीण आहे. डाएट म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे होय. कॅलोरी डेफिसिट म्हणजेच शरीराने खर्च केलेल्या कॅलोरीपेक्षा कमी कॅलोरी घेणे हे वजन कमी करण्याचे मूळ तत्त्व आहे. यासाठी आपण आहारात अधिक प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जसे अंडी, डाळी, कडधान्ये, पनीर, टोफू इत्यादी. प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि स्नायूंना पोषण तत्त्वेही मिळतात. याशिवाय फायबरयुक्त भाज्या आणि फळे खाल्ल्याने पचन सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते. साखर, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, आणि प्रोसेस्ड फूड यांचा जास्त वापर टाळावा, कारण त्यातून अतिरिक्त कॅलोरी तर मिळतात पण पोषण फारसे मिळत नाही.
वजन कमी करण्याच्या प्रवासात दररोज भरपूर पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. किमान २.५ ते ३ लिटर पाणी दिवसातून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि भूकही नियंत्रित होते. याशिवाय शरीर फ्रेश वाटते.
55
पुरेशी झोपही महत्वाची
वजन कमी करताना नियमित झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करणे देखील आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि भूक वाढते. त्याचप्रमाणे तणावामुळे भावनिक खाण्याची (Emotional Eating) सवय लागते, जी वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून, ध्यान, योग, किंवा सकारात्मक विचारसरणी यांचा अवलंब केल्यास तणाव नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.