Poonam Pandey: 'मी जिवंत आहे' सांगत पूनम पांडेने पोस्ट केला व्हिडीओ

शनिवारी सकाळी पूनमने स्वतः इंस्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत ‘मी जिवंत आहे’ असे शेअर केले आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती (Cervical Cancer Awareness) करण्यासाठी तिने स्वतःच्याच मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवली असा तिचा दावा आहे.

vaidehi raje | Published : Feb 3, 2024 8:20 AM IST / Updated: Feb 03 2024, 02:22 PM IST

Poonam Pandey:  पूनम पांडेचा मृत्यू झाला नसून ती जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी पूनमने स्वतः इंस्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत ‘मी जिवंत आहे’ असे शेअर केले आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती (Cervical Cancer Awareness) करण्यासाठी तिने स्वतःच्याच मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवली असा तिचा दावा आहे. 

अधिकृत इंस्टाग्राम हॅन्डलवरून मृत्यूची बातमी केली शेअर

पूनम पांडेच्या टीमने शुक्रवार (2.2.2024) रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करून माहिती दिली होती की पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे (Cervical Cancer) वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. पूनम पांडेच्या मॅनेजरने देखील दावा केला होता की मॉडेल, अभिनेत्री आणि रिॲलिटी टीव्ही स्टार पूनम पांडेचा गुरुवारी रात्री गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाने मृत्यू झाला. मात्र आता हा निव्वळ एक स्टंट असून पूनम जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिने शनिवारी इन्स्टाग्रामवर स्वतः जिवंत असल्याची घोषणा करणारे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

पूनम पांडेच्या कुटुंबीयांनी मौन बाळगले

पूनमच्या अनपेक्षित मृत्यूमुळे असंख्य चाहते आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला होता. काल दिवसभर सगळीकडे तिच्या मृत्यूची बातमी पसरली होती. तसेच त्या निमित्ताने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविषयी देखील भरपूर माहिती प्रसिद्ध झाली. तर तिच्या मृत्यूच्या कारणाविषयी तसेच तिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आश्चर्यकारक मौन बाळगले होते. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी जाहीर होताच अनेकांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापैकी कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे फोन एकतर बंद होते किंवा संपर्कात नव्हते.

पूनमच्या मृत्यूवर कमाल आर खानची प्रतिक्रिया

काही वृत्तांत असे म्हटले होते की पूनमचा मृत्यू पुण्यात झाला, तर काहींचा दावा होता की तिचे पार्थिव तिच्या मूळ गावी, कानपूरमध्ये होते. दरम्यान, माजी अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान (KRK) ने पूनमच्या मृत्यूचे वृत्त फेटाळून लावत याला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हटले होते. शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पूनमचा एक फोटो शेअर करत त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "तिच्या मृत्यूची बातमी म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. पूनम पांडे जिवंत आहे." त्यानंतर त्त्याने पूनमचा एक व्हिडीओही देखील शेअर केला आणि लिहिले की, “फक्त 2 दिवसांपूर्वी पूनम एका पार्टीत मजा करत होती!”

“मी जिवंत आहे” - पूनम पांडे 

कालच्या सगळ्या प्रकरणानंतर पूनमने आज स्वतःच व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केले आहे की ती जिवंत आहे.तिने लिहिले की, “तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करणे मला भाग आहे - मी आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोग मला झालेला नाही, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे उद्भवलेल्या हजारो महिलांचे बळी गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य गोष्ट HPV लस आणि लवकर तपासण्यांमुळे हे शक्य आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही याची खात्री करण्याचे साधन आपल्याकडे आहे. चला एकत्रितपणे, रोगाच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी आणि आणण्यासाठी प्रयत्न करूया.”

आणखी वाचा -

श्रीदेवी प्रसन्नच्या लाँचनिमित्त सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लुक

Poonam Pandey च्या मृत्यूच्या बातम्यांदरम्यान KRKने शेअर केला अभिनेत्रीचा पार्टी करतानाचा व्हिडीओ, रोजलिन खान म्हणाली.....

Poonam Pandey : अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा विवाह

Share this article