पिठोरी अमावस्येला पिठोरा, पिठोर अशा वेगवेगळ्या नावांनी ओखळले जाते. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. संतान प्राप्तीसाठी महिला पिठोरी अमावस्येला व्रत करतात. हे व्रत केल्याने त्याचे आयुष्यात शुभ परिणाम आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, इंद्राची पत्नी शचीने पिठोरी अमावस्येचे व्रत केले होते. यामुळे संतती प्राप्ती होण्यासह कुटुंबाची समृद्धी झाली.
याशिवाय पिठोरीच्या दिवशी सप्तमातृकांचीही पूजा केली जाते. दक्षिण भारतात सप्तमातृकांच्या पूजेला विशेष महत्व आहे. ब्राम्हणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमरी, वाराही, चामुंडा किंवा नरसिंही या सप्तमातृका आहेत. यांची पूजा केली जाते.