ऑफिसच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी फॉलो करा हे डेली रुटीन, रहाल टेंन्शन फ्री

सध्याच्या स्पर्धात्मक जगात स्वत:ची वेगळी ओखळ निर्माण करण्याची प्रत्येकाची धडपड असते. तर ऑफिसमध्येही चारचौघात आपले काम किती वेगळे आहे हे दाखवून देण्याच्या नादात काहीजण त्याचा अधिक ताण घेतात. यामुळे चिडचिड होत असेल तर डेली रुटीन काय असावे जाणून घेऊया.

Work Stress Management Tips : सध्या बहुतांशजण ऑफिसच्या कामाचा अधिक ताण घेत असल्याचे दिसून येते. काहीजण ऑफिसमधून घरी आल्यानंतरही काम करतात. याचा झोपेवर परिणाम होते. परिवारासोबत पुरेसा वेळ न घालवणे, स्वत:कडे लक्ष न देता येणे या काही गोष्टींमुळे तणाव वाढला जातो. हळूहळू तणाव अधिक वाढून डिप्रेशनचे रुप घेतो. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) नुसार, वर्ष 2019 मध्ये काम करणाऱ्या वयोगटातील 15 टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. यावरुन कळले की, ऑफिसच्या कामाचा अत्याधिक ताण किती असू शकतो आणि यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. जाणून घेऊया मानसिक तणाव कमी करण्यासाठी डेली रुटीन कसे असावे याबद्दल सविस्तर...

सकाळचे रुटीन कसे असावे?

सकाळचे रुटीन सेट करताना तुमची सकाळची उठण्याची एक वेळ निश्चित करा. यासाठी रात्री झोपण्याची वेळही ठरवा. जेणेकरुन सकाळी उठण्यास मदत होईल. ज्या व्यक्ती सकाळी चहा किंवा कॉफी पितात त्यांनी हलके गरम पाणी किंवा लिंबाचा रस मिक्स करुन पाणी प्यावे. याशिवाय सकाळी फोनवर सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडीओ पाहण्याएवजी योगाभ्यास किंवा मेडिटेशन करावे.

ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

ऑफिसचा तणाव कमी करण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे म्हणजे आळशीपणा करू नका. हे तणावाचे एक मोठे कारण आहे. ज्या व्यक्ती काम करणे वारंवार टाळतात त्यांचे काम नेहमीच अपूर्ण राहिले जाते. यामुळे तणाव वाढला जातो. यामुळे कामाची लिस्ट तयार करुन दिवसभरात ते पूर्ण करा. ऑफिसमध्ये दोन ते तीन तासांदरम्यान 15-15 मिनिटांचा ब्रेक घ्या. खुर्चीवरुन उठून चाला किंवा सहकर्मचाऱ्याशी बोला. अथवा ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकता. ऑफिसचे काम घरी घेऊन न येण्याचा प्रयत्न करा.

डाएट कसे असावे?

हेल्दी डाएट फॉलो करावे जेणेकरुन शरिराला संपूर्ण दिवसभरासाठी उर्जा मिळेल. लंच झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ताजी फळ, चणे, शेंगदाणे याचे सेवन करू शकता. काम करताना भूक लागल्यास ड्राय फ्रूट्स किंवा फळांचे सेवन करा. यावेळी जंक फूड्सचे सेवन करणे टाळा. शरिराला हाइड्रेट ठेवणेही फार महत्वाचे आहे. यामुळे कामामध्ये थोड्याथोड्या वेळाने पाणी प्या.

तणाव कमी करण्यासाठी काय करावे?

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

मुलांसोबतचे नाते मजबूत करायचे आहे? रात्री ८ वाजता करा हे काम!

2025 मध्ये संपूर्ण वर्षभर रहाल हेल्दी, आजपासूनच फॉलो करा या 6 सवयी

Share this article