यंदाच्या वर्षी जेष्ठ शुक्ल एकादशीच्या तिथीसंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. खरंतर, तिथी दोन दिवसांची असल्याने दोन्ही दिवस निर्जला एकादशीचे व्रत केले जाऊ शकते. अशातच जाणून घेऊया निर्जला एकादशीनिमित्त भगवान विष्णूंच्या कोणत्या मंत्राचा जाप करावा.
Nirjala Ekadashi 2024 : प्रत्येक वर्षी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठ महिन्यातील शुल्क पक्षाच्या एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची खास पूजा-प्रार्थना केली जाते. याशिवाय बहुतांश महिला उपवासही ठेवतात.निर्जला एकादशीची तिथी आज(17 जून) आणि उद्या (18 जून) अशा दोन दिवसांची असल्याने दोन्ही दिवस निर्जला एकादशीचे व्रत केले जाऊ शकते.यंदाच्या निर्जला एकादशीनिमित्त तुम्ही भगवान विष्णूंच्या काही मंत्रांचा जाप करुन आयुष्यातील दु:ख दूर करू शकता.
भगवान विष्णूंचे मंत्र
या वस्तूंचे करा दान
सनातन धर्मात वर्षभरातील 24 एकादशींपैकी सर्वाधिक महत्त्वाची आणि कठीण एकादशीचे व्रत निर्जला एकादशीचे असते. या दिवशी व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीला सर्व एकादशींचे समतुल्य फळ मिळते असे मानले जाते. या एकादशीला भीमसेनी एकादशीही म्हटले जाते. निर्जला एकादशीनिमित्त पूजा-प्रार्थनेसह दानालाही फार महत्तव आहे.
निर्जला एकादशीनिमित्त तुम्ही पंखा, चप्पस, वस्र दान करु शकता. यामुळे पित्र खुश होती. याशिवाय गोड पाण्याने भरलेला घडा दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्रासह शंकर आणि रवि योग जुळून येत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो.
(DISCLAIMER लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
प्रेमानंद महाराज : पालकांच्या कृतीचे परिणाम मुलांना भोगावे लागतात का ?