विकेंड पार्टीसाठी घरी मित्रमंडळी येणार असल्यास त्यावेळी चटपटीत अशी रेसिपी कोणती तयार करायची असा प्रश्न पडलाय का? तर विकेंड पार्टीसाठी तुम्ही घरच्याघरीच मसालेदार चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार करू शकता.
Chicken French Fries Recipe in Marathi : फ्रेंच फ्राइज रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांना आवडते. खरंतर, झटपट होणारी रेसिपी असण्यासह टेस्टीही असते. अशातच विकेंड पार्टीला घरी मित्रमंडळी येणार असल्यास तुम्ही चटपटीत असे मसालेदार चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार करू शकता. जाणून घ्या संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर...
साहित्य
300 ग्रॅम बोनलेस चिकन
एक टिस्पूच काळी मिरी पावडर
एक टिस्पून लसूण पावडर
एक टिस्पून जीरे पावडर
एक टिस्पून दालचिनी पावडर
एक टिस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
एक टिस्पून हळद
एक टिस्पून धणे पावडर
आवश्यकतेनुसार मीठ
तळण्यासाठी दोन वाटी तेल
कृती
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घेत त्याचे पातळ उभे बारीक तुकडे करा.
गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये चिकनचे तुकडे शिजण्यासाठी ठेवा. असे केल्याने चिकनला येणारा वास दूर होईल.
गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करत चिकनला गोल्डन रंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या.
चिकन तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.
एका बाउलमध्ये काळी मिरी पावडर, लसूण पावडर, जीरे पावडर, दालचिनी पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर व्यवस्थितीत एकत्र मिक्स करा. यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला. अशाप्रकारे तुमचा पेरी पेरी मसाला तयार होईल.
पेरी मसाला एका बाउलमध्ये काढून घेत त्यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे व्यवस्थितीत मिक्स करा. जेणेकरुन चिकला पेरी पेरी मसाला व्यवस्थितीत लागला जाईल.
एका प्लेटमध्ये विकेंड पार्टीसाठी मसालेदार पेरी पेरी चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार होईल. यासोबत टोमॅटो कॅचअप अथवा मोयोनिज खाऊ शकता.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.