12/31/23 : यंदाच्या वर्षातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी या कारणास्तव आहे खास

New Year Eve's : यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच अंकशास्राच्या (Numerology) दृष्टीकोनातून 31 डिसेंबर, 2023 हा दिवस अत्यंत खास असणार आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Dec 20, 2023 9:54 AM IST / Updated: Dec 20 2023, 04:23 PM IST

The significance of 12/31/23 : यंदाच्या वर्षातील अखेरचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर, 2023 ही तारीख अंकशास्राच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे. कारण या तारखेचे अंकशास्रामध्ये विशिष्ट महत्त्व आहे. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत…

अंकशास्रानुसार (Numerology), यंदाचे वर्ष 2023ची शेवटची तारीख 12/31/23 अशी आहे. म्हणजेच यामध्ये विशिष्ट संख्येच्या क्रम 123123 येतो. अंकांच्या या क्रमामुळे येणाऱ्या काळात काहीतरी नवं घडणार आहे हे दर्शविले जात आहे. अंकशास्राच्या क्षेत्रात, अंकांबद्दल अभ्यास केला जातो. अंकशास्रात 123 क्रमांकाचा अनुक्रम हा नव्या संधी आणि कृती करण्यासाठी प्रेरित करतो.

123 अंकांचा अनुक्रम हा एंजेल नंबर  (Angel Number) असल्याचेही मानले जाते. अंकशास्रात विशिष्ट पद्धतीने आलेल्या क्रमांकाबद्दल असे मानले जाते की, युनिव्हर्सकडून (Universe) तुम्हाला मेसेज मिळणार आहे. हे क्रमांक एखाद्याला आयुष्यात सातत्याने दिसू शकतात. एखादे खर्चाचे बिल, घड्याळाच्या वेळा यामध्ये हे अंक तुम्हाला दिसू शकतात. हे क्रमांक दिसल्यानंतर त्या क्रमांकाच्या महत्त्वाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

एक विशिष्ट तारीख जसे, 4/3/21 म्हणजेच 4321 किंवा 2/22/22 म्हणजेच 22222, याचा अर्थ असा होतो की, वैयक्तिक मेसेजच्या पलीकडे जाऊन विचार करा.

अंकशास्रात 123 क्रमांकाचे महत्त्व काय?
अंकशास्राच्या क्षेत्रात प्रत्येक क्रमांकाचा एक वेगळा अर्थ होतो. क्रमांक हे एखाद्या विशिष्ट पॅटर्नमध्ये येतात. जसे- 123. यावेळी प्रत्येक अंकाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

अंकशास्राच्या अंदाजानुसार, 123 या अंकांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

1 अंक : हा अंक नवी सुरूवात असल्याचे दर्शवतो

2 अंक : हा अंक भावना आणि चांगल्या वेळचा आनंद दर्शवतो

3 अंक : शिकण्यावर लक्ष द्या आणि वैयक्तिक वाढ करा हे दर्शवतो

एकूणच 123 हा क्रमांक, नवी सुरुवात, जे चालले आहे त्याचा आनंद घ्या आणि प्रत्यक्षात जे करायचे आहे त्या दृष्टीने पावले उचलण्यास सांगतो. याशिवाय या अंकांची फोड केल्यास म्हणजेच 1+2+3 या अंकांची बेरीज 6 येते. 6 हा अंक काळजी, प्रेम दर्शवतो. यंदाच्या वर्षाचा अखेरचा दिवस 12/31/2023 याचे सकारात्मक महत्त्व असून तो अत्यंत खास असणार आहे.

12/31/2023 तारीख खास का आहे?

12/31/2023 तारखेला म्हणजेच नव वर्षाच्या पूर्वसंध्येला अंकशास्रानुसार 123 क्रमांक वारंवार आल्याने अत्यंत खास आहे. कारण हा दिवस काहीतरी खास मेसेज देणारा आहे. तज्ज्ञांच्या मते प्रगतीच्या नव्या संधी, भविष्याचे शुभसंकेत अशा काही गोष्टी हा क्रमांक दर्शवतो.

वर्षाच्या शेवटच्या तारखेतील प्रत्येक क्रमांकाचा एक विशिष्ट अर्थ होतो. अंकशास्रानुसार, 12 अंक हा तुमच्या खऱ्या इच्छा, 23 हा अंक मजूबत आणि स्थिर उर्जांचा वास असल्याचे दर्शवते. याशिवाय 31 क्रमांक हा नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी काही गोष्टींमध्ये अडथळा अथवा नियोजित केलेल्या गोष्टी होणार नाहीत आणि सावधगिरीचा इशारा देणारा आहे. अंकशास्रात 2023 वर्ष सत्य आणि आंतरिक भावनानेला महत्त्व देणारे आहे. याशिवाय 2024 वर्ष हे उर्जा आणि तेज दर्शवणारे आहे.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Makar Sankranti 2024 : मकर संक्रात 14 जानेवारी नव्हे तर या दिवशी असणार

Christmas 2023 : 50 रूपयांत ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी खास DIY Hacks

Share this article