हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतेय खा हे फूड्स

Winter Health Care : हिवाळ्यात वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहाण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर खास फूड्स खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल. 

Rujuta Diwekar Tips : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट (Celebrity Nutritionist) ऋजुता दिवेकर हिच्याबद्दल बहुतांश लोकांना माहिती आहे. ऋजुता दिवेकरने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ते काही प्रसिद्ध सेलिब्रेटींजला त्यांच्या फिटनेस जर्नीत (Fitness Journey) मदत केली आहे. एवढेच नव्हे ऋजुता दिवेकर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून युजर्सला काही फिटनेस टिप्सही देत असते.

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशातच ऋजुता दिवेकरने हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते फूड्स खावेत याबद्दल सांगितले आहे. या फूड्समुळे तुम्ही काही आजारांपासून देखील दूर राहू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फूड्स

ऋजुता दिवेकर हिने नुकत्याच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ऋजुता पाच अशा सुपर फूड्सबद्दल सांगितले आहे ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल.

बाजरी
ऋजुता दिवेकरने आपल्या व्हिडीओमध्ये बाजरीचा उल्लेख केला आहे. बाजरीत काही खनिज आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्याच्या दिवसात बाजरीचे सेवन केल्यास सांधेदुखीच्या समस्येपासून दूर राहू शकता. बाजरी तुम्ही तूप किंवा मखानासोबत खाऊ शकता.

गूळ आणि तूप
गूळ आणि तूप मिक्स करून खाल्ल्यास कफ आणि नाक वाहणे, डोके दुखणे अशा सायनसच्या (Sinus) लक्षणांपासून दूर राहाता येईल. गूळ आणि तूप दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर खावे.

कुळीथ
कुळीथ हे औषधी धान्य म्हणून ओळखले जाते. जे किडनी स्टोन (Kidney Stones) पासून दूर ठेवण्यास मदत करते. याशिवाय हिवाळ्यात त्वचा हाइड्रेट राहण्यासाठी देखील कुळीथ फायदेशीर ठरते. याचे सेवन भात किंवा तूपासोबत करू शकता.

मखाना
मखानामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात मखानाचे सेवन करावे रुजुता दिवेकर सांगते. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी (Vitamin D) ची कमतरता पूर्ण होते. तसेच पचनक्रियेसंबंधित समस्याही दूर होतात.

तीळ
सफेद तीळ आणि काळे तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने शरीर आतमधून उष्ण राहण्यासाठी मदत होते. याशिवाय हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहाता. तुम्ही तीळाचे लाडू खाऊ शकता. तसेच तीळाचे तेल हे डोळे, त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर असते.

VIDEO: ऋजुता दिवेकरने सांगितल्या हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास टिप्स, पाहा व्हिडीओ

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट? कोणते आरोग्यासाठी फायदेशीर

Health : थंडीत वजन वेगाने वाढलंय? या टिप्स करा फॉलो

Health Care : थंडीत वाढतो Heart Attackचा धोका, अशी घ्या आरोग्याची काळजी

Share this article