पुढच्या वर्षात मकर संक्रात 14 जानेवारी नव्हे तर या दिवशी साजरी होणार
मकर संक्रात हा हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. पण पुढच्या वर्षात हा सण कधी साजरा केला जाणार हे जाणून घेऊया...
सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रात साजरी केली जाते. गेल्या 14 वर्षांपासून सूर्य मकर राशितच प्रवेश करत आला आहे.
ज्योतिषांनुसार, 2024 मध्ये सूर्य 14 जानेवारीला अंदाजे रात्री तीन वाजता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळेच मकर संक्रात 14 जानेवारीला साजरी होणार नाही.
ज्योतिषांनुसार, 15 जानेवारीच्या सकाळी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा सूर्याने मकर राशीत प्रवेश केलेला असेल. यामुळेच वर्ष 2024 मध्ये मकर संक्रात 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
उज्जैनचे ज्योतिष पंडित प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, मकर संक्रातीला स्नान-दान, उपाय आणि पूजा अशी कार्य 15 जानेवारीलाच करणे शुभ मानले जाणार आहे.
ग्रंथांनुसार, मकर संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण होते. उत्तरायणापासून देवतांचा दिवस सुरू होतो. यामुळेच मकर संक्रातीला विशेष महत्त्व आहे.