50 रूपयांत ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी खास DIY Hacks
येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी खासकरून ख्रिसमस ट्री सजवला जातो.
घरच्या घरी तुम्ही फक्त 50 रूपयांत ख्रिसमस ट्री सजवू शकता. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी खास DIY Hacks कोणते आहेत पाहूया...
दिवाळीतील काही मेणबत्त्या राहिल्या असल्यास त्या ख्रिसमस ट्रीवर लावू शकता. इलेक्ट्रिक मेणबत्त्यांचा पर्याय तुम्ही सजावटीसाठी निवडू शकता.
ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्ही चॉकलेट्सचा वापर करू शकता. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स ख्रिसमस ट्रीवर लावू शकता.
ख्रिसमस ट्री अधिक खर्चाशिवाय सजवायचा असल्यास दिवाळीला लावण्यात आलेल्या लाइट्सचा वापर करू शकता. रात्रीच्या वेळेस ख्रिसमस ट्रीवर लाइट्स लावल्याने अतिशय सुंदर दिसेल.
ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी लहान मुलांची मदत घेऊ शकता. ट्री सजावटीसाठी पेपर क्राफ्ट तयार करून लावू शकता.
पांढऱ्या रंगाच्या फुलांमुळे तुमच्या ख्रिसमस ट्री आकर्षक दिसेल. याशिवाय फळं ही लावू शकता. अथवा ख्रिसमस ट्री फूल आणि फळांनी सजवू शकता.
ख्रिसमस ट्रीवर फॅमिलीचे फोटो लावू शकता. हे फोटो रंगीत धागा अथवा रिबीनचा वापर करून ख्रिसमस ट्रीवर लावा.
ख्रिसमस ट्रीवर चांदण्याही लावू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला चांदणीचे क्राफ्ट 50 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. अथवा घरच्या घरीही चांदणी तयार करू शकता.