एक सिगारेट करते पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी तर महिलेचे आयुष्य २२ मिनिटांनी कमी

Published : Dec 31, 2024, 01:48 PM ISTUpdated : Dec 31, 2024, 01:51 PM IST
smoking cigarette

सार

युनिवर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासानुसार, एक सिगारेट पुरुषांचे आयुष्य १७ मिनिटांनी आणि महिलांचे २२ मिनिटांनी कमी करते. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणारे १०-११ वर्षे कमी जगतात.

सिगारेट ओढण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. नुकत्याच एका अभ्यासानुसार धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी व मिहिलेचे आयुष्य २२ मनिटांनी कमी होते, असा निष्कर्ष युनिवर्सिटी कॉलेज लंडन( युसीएल) विद्यापीठाने एका पाहणीतुन काढला आहे. ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीने युएलसीने ही पाहणी केली. एका सिगारेटमुळे माणसाचे आयुष्य ११ मिनिटांनी कमी होते, असा पुर्वी समज होता.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधील संशोधकांनी दशकानुदशक सिगारेट ओढण्याच्या सवयी आणि आरोग्यावरील परिणामांचा मागोवा घेतला. त्यांनी असे निष्कर्ष काढले की, जे धूम्रपान सोडत नाहीत, असे व्यक्ती धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींशी तुलना करता सरासरी १० ते ११ वर्षे कमी आयुष्य जगतात.

धूम्रपान सोडण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक

UCL च्या अल्कोहोल आणि तंबाखू संशोधन गटातील डॉ. सारा जॅक्सन यांनी द गार्डियनला सांगितले की, या निष्कर्षांमुळे धूम्रपानाचे गंभीर परिणाम समोर येतात. “सरासरी, धूम्रपान करणारे व्यक्ती आयुष्याची सुमारे दहा वर्ष गमावतात करतात. सुधारित आकडेवारीनुसार, 20 सिगारेट असलेला एक पॅक सुमारे सात तास आयुष्य कमी करतो. त्यामुळे धूम्रपान सोडण्यासाठी तातडीने पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

धूम्रपानाचे हे आहेत दुष्परीणाम

१. श्वसनसंस्थेवर परिणाम:

• फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD), आणि ब्रॉंनकायटिस होण्याचा धोका वाढतो.

• श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत खोकला होणे.

२. हृदय व रक्तवाहिनीसंबंधी आजार:

• हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

• रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

३. कर्करोगाचा धोका:

• तोंड, घसा, अन्ननलिका, आणि पचनसंस्थेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

• सिगारेटमधील रसायने शरीरात कर्करोगजनक पेशी निर्माण करतात.

४. प्रजनन क्षमता व लैंगिक आरोग्यावर परिणाम:

• पुरुषांमध्ये नपुंसकत्व (इरेक्टाइल डिसफंक्शन) होण्याचा धोका वाढतो.

• महिलांमध्ये वंध्यत्वाची शक्यता आणि गर्भधारणेसंबंधित जटिलता होऊ शकतात.

५. त्वचेला हानी:

• सिगारेटमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडतात आणि चेहरा वयस्कर दिसतो.

• त्वचेची लवचिकता कमी होते.

६. इतर दुष्परिणाम:

• रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

• दात पिवळसर होतात, हिरड्यांना इजा होते आणि तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

• मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊन ताण-तणाव अधिक जाणवतो.

प्रभावी उपाय:

• सिगारेट सोडण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

• निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) किंवा औषधोपचार वापरा.

• व्यसनमुक्तीसाठी कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळवा.

सिगारेट सोडल्याने शरीराला हळूहळू दुरुस्ती होण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे लवकर निर्णय घेणे फायदेशीर ठरते.

आणखी वाचा-

या 5 फूड्सने करू नका दिवसाची सुरुवात, दिवसभर रहाल त्रस्त

या 5 सवयींमुळे सुधारेल मानसिक आरोग्य, तणावही राहिल दूर

PREV

Recommended Stories

Weekly Horoscope : चंद्र कर्क ते तूळ राशीत भ्रमण करेल, या लोकांसाठी आठवडा लाभदायी, तर या राशींनी रागावर नियंत्रण ठेवावे!
आलिया-कंगनासारखी चेहऱ्यावर येईल झळाळी, ट्राय करा हे 1gm गोल्ड इअररिंग