Navratri 2024 : एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आपण चप्पल-शूज घालून जात नाही. मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवतो. पण देशात असे अनोखे मंदिर आहे जेथे देवीला फूल-प्रसाद नव्हे तर चक्क चप्पल अर्पण केली जाते.
Navratri 2024 : देशात अनेक रहस्यमयी, ऐतिहासिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराच्या काही अख्यायिका देखील आहेत. मंदिरात दर्शनासाठी जाताना प्रत्येक भाविक आपल्या सोयीनुसार फुल-प्रसाद घेऊन जातो. देवाला फुल-प्रसाद अर्पण करत त्याच्यापुढे आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या जातात. पण देशात असे एक मंदिर आहे जेथे देवीला चक्क चप्पल अर्पण केल्या जातात. हे मंदिर भोपाळमधील कोलार जिल्ह्यात आहे. या मंदिराला जीजी बाई मंदिर नावाने ओखळले जाते.
डोंगरावर आहे मंदिर
भोपाळमधील कोराल जिल्ह्यातील डोंगरावर मंदिर स्थित आहे. या मंदिराला सिद्धदात्री पहाडवाला मंदिर म्हटले ते. स्थानिक नागरिक याला जीजी बाई मंदिर असे म्हणतात. या मंदिरातील अनोखी परंपरा अशी आहे की, प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविक देवीच्या चरणी चप्पल-शूज आणि सँडल अर्पण करतात.
मुलींना दिल्या जातात देवीच्या वस्तू
देवी सिद्धदात्री मंदिराची स्थापना ओम प्रकाश महराज यांनी 30 वर्षांआधी केली होती. मंदिराला 300 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतर भक्ताला देवीचे दर्शन होते. मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, भाविकांकडून देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या सँडल, शूज किंवा चप्पल मुलींना दान केल्या जातात. याशिवाय परदेशात देखील देवीचे काही भाविक असून तेथून ते देवीसाठी शूज-चप्पल आणि चश्मा अर्पण करतात.
गुप्त नवरात्रीवेळी देवीचा विशेष श्रृंगार
मंदिरात संपूर्ण वर्षभरात वेळोवेळी धार्मिक अनुष्ठान सुरु असते. गुप्त नवरात्रीवेळी देवीचा दररोज खास श्रृंगार केला जातो. मंदिरात अन्य देवींच्या बाल रुपातील मुर्तीही स्थापन करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा :
Navratri 2024 वेळी या 2 राशींवर राहणार देवी दुर्गेचा आशीर्वाद, नशीबही चमकणार
Navratri 2024 : देशातील अनोखे मंदिर, जेथे विधवा महिला करतात देवीची पूजा