National Best Friend Day 2024 : आयुष्यात मित्रमैत्रणी असाव्यात, होतात हे 6 आरोग्यदायी फायदे

प्रत्येक वर्षी 8 जूनला राष्ट्रीय सर्वोत्तम मित्र दिन साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जीवलग मित्राला एखादे खास गिफ्ट, मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. पण आयुष्यात मित्रमैत्रीणी असण्याचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

National Best Friend Day 2024 : आयुष्यात एखादा तरी जीवलग मित्रमैत्रीण असणे फार महत्त्वाचे असते. या व्यक्तीसोबत तुम्ही मनातल्या सर्वकाही गोष्टी, सुख-दु:ख शेअर करू शकता. याशिवाय जीवलग मित्राला आपण घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच आयुष्यात स्थान देतो. खरंतर, मैत्री असण्याचा फायदा एखमेकांना पाठिंबा देण्यापूर्ता मर्यादित नाही. याचे काही अनेक फायदे आहेत. मैत्री तुम्हाला शारिरीक आणि मानसिक रुपात हेल्दी राहण्यासही मदत करते. जाणून घेऊया आयुष्यात मित्रमैत्रीणी असण्याचे काही फायदे सविस्तर...

शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर
काही संशोधनातून समोर आलेय की, आयुष्यातील घट्ट नात्यांमुळे शारिरीक आरोग्य सुधारले जाते. एखादा जीवलग मित्र असल्याने व्यक्तीला मधुमेह, हृदय विकाराचा झटका अथवा स्ट्रोकसारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय जीवलग मित्रामुळे आयुष्यातील एकटेपणाची भावना कमी होते. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊन तुम्ही दीर्घायुष्याच्या दिशेने वाटचाल करता.

मन आनंदित होते
वर्ष 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार, जीवलग मित्रमैत्रीण असल्याने आयुष्य आनंदी असल्यासारखे वाटते. या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवण्यासह त्याच्या प्रति सकारात्मक दृष्टीकोनही ठेवता. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो आणि तुम्ही देखील सकारात्मक विचार करता. आठवड्यातून एकापेक्षा अनेक वेळा मित्रपरिवाराला भेटल्याने मन आनंदित होते.

तणाव कमी होण्यास मदत
मैत्रीमुळे आयुष्यातील तणाव कमी होण्यास मदत होते. खरंतर,जीवलग मित्रासोबत मनमोकळेपणाने बोलल्यानंतर मन हलके झाल्यासारखे वाटते. यामुळे तणावही कमी होतो. मानसिक आरोग्य सुधारले जाते.

एकटेपणा दूर होतो
जीवलग मित्रमैत्रीणी असल्याने आयुष्यातील एकटेपणा दूर होतो. एकटेपणामुळे नैराश्य येण्यासह मानसिक आणि शारिरीक समस्या उद्भवतात. वर्ष 2018 च्या एका अभ्यासानुसार, मैत्रीमुळे तुमच्यामधील आत्मविश्वासही वाढला जातो.

फिटनेसवर होतो सकारात्मक परिणाम
जीवलग मित्रमैत्रीणींसोबत व्यायाम केल्याने तुम्ही अधिक फिट आणि हेल्दी राहता. एका अभ्यासात असे सांगण्यात आलेय की, ज्या व्यक्ती आपल्या मित्रमैत्रीणींसोबत व्यायाम करतात त्यांच्यामध्ये तणाव फार कमी असतो. अशा व्यक्ती शारिरीक आणि मानसिक हेल्दी देखील राहतात.

आयुष्यात प्रत्येक सुख-दु:खात आधार देतात 
आयुष्यात चढ-उतार नेहमीच येत राहतात. जसे की, नोकरी जाणे, परिवारामध्ये वाद अथवा आर्थिक समस्या. अशा आव्हानांचा सामना करताना जीवलग मित्रमैत्रीण तुमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. यामुळे आयुष्यातील आव्हानांचा सामना करणे सोपे होते.

आणखी वाचा :

World Food Safety Day 2024 : फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करता का? नेहमीच तपासून पाहा लेबल अन्यथा...

Bird Flu मुळे जगात पहिला मृत्यू, जाणून घ्या H5N2 बद्दल सर्वकाही

 

Share this article