Narali Purnima 2024 : कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ का अर्पण करतात? वाचा

Narali Purnima 2024 Puja Vidhi : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेचा सण असून कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. 

Chanda Mandavkar | Published : Aug 19, 2024 3:15 AM IST
16
कोळी बांधवांचा प्रमुख सण

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जाणार आहे. यंदा नारळी पौर्णिमेचा सण 19 ऑगस्टला आहे. 

26
नारळी पौर्णिमेचा सण

एक नारळ दिलाय दर्या देवाला, वरसाचा मान देव दर्या देवाला.... श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधीवत पूजा करतात. तसेच समुद्राला नारळ अर्पण करुन प्रार्थना देखील करतात. खरंतर, दर्याला सोन्याचा नारळ देतात अशी प्रथा आहे. 

36
नारळी पौर्णिमा तिथी

श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहाणारे लोक मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात. या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा केली जाते. पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा 19 ऑगस्टला सोमवारी साजरी करण्यात येईल. तर पौर्णिमा तिथी ही पहाटे 03 वाजून 04 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी संपणार आहे. 

46
कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात?

नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्याजवळ राहाणारे लोक साजरे करतात. श्रावण महिना सुरु झाला की, पावसाचा जोर वाढतो त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवाना बोटी आणि जहांजाची वर्दळ थांबवावी लागते. पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यामुळे कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्राची पूजा करावी लागते. तसेच समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करुन वरुणदेवाची पूजा केली जाते. 

56
कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

नारळी पौर्णिमेच्या दिवशी होड्यांना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात, अशी प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.

66
नारळी पौर्णिमा पूजा पद्धत
  • नारळी पौर्णिमेला शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते.
  • पूजाविधी पार पडल्यानंतर कोळी बांधव आपल्या बोटी सजवून समुद्रात पुन्हा प्रवास करतात.
  • समुद्राची प्रदक्षिणा केल्यानंतर ते नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करतात. महिला वर्ग सोन्याचे आभूषण परिधान करुन गोडाधोडाचे पदार्थ बनवतात.
  • कोळी बांधवांसाठी हा सण अधिक खास मानला जातो.

आणखी वाचा : 

Narali Purnima 2024 निमित्त प्रियजनांना शुभेच्छापत्र पाठवून करा सण साजरा

नारळी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाच्या 5 खास रेसिपी, नक्की करा ट्राय

Share this Photo Gallery