येत्या 19 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी गोडाचे पदार्थ तयार केले जातात. अशातच ओल्या नारळापासून पुढील 5 सोप्या रेसिपी तयार करू शकता.
नारळी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाचे लाडू तयार करू शकता. यासाठी पीठीसाखर, ओले नारळ, रव्याचा वापर करावा लागेल.
नारळाची वडी तयार करण्यासाठी ओला नारळ, गूळ, ड्राय फ्रुट्स, साखरेचा वापर करावा लागेल. फ्रिजमध्ये नारळाची वडी थंड करायला ठेवल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
ओल्या नारळ-गुळाची बर्फी तयार करण्यासाठी गुळाचा पाक, ड्राय फ्रुट्स, साखरचा वापर करावा लागेल. नारळीपौर्णिमेला बर्फीची सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पहा.
पारंपारिक पुरणपोळीसाठी चण्याच्या डाळीचे पुरण वापरले जाते. पण नारळीपौर्णिमेसाठी तयार केल्या जाणाऱ्या पुरणपोळीसाठी ओल्या नारळाचे सारण वापरुन रेसिपी तयार करू शकता.
नारळी पौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने नारळी भाताची रेसिपी तयार करू शकता. याचा नैवेद्यही देवाला दाखवू शकता.