Narak Chaturdashi 2024 च्या दिवशी काय करावे आणि काय नाही? घ्या जाणून

Published : Oct 15, 2024, 10:38 AM IST
Narak Chaturdashi 2024

सार

Narak Chaturdashi 2024 : दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यामागे एक पौराणिक कथा असून जी भगवान कृष्ण आणि राक्षस नरकासुरासंबंधित आहे. यंदा नरक चतुर्दशी कधी, या दिवशी काय करावे आणि काय नाही हे जाणून घेऊया...

Narak Chaturdashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी असते. या दिवशी मृत्यूचा देवता यमराज याची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला यमाच्या नावाच दिवा लावला जातो. जाणून घेऊया यंदा नरक चतुर्दशी कधी, या दिवशी काय करावे आणि काय नाही याबद्दल सविस्तर...

यंदा नरक चतुर्दशी कधी?
पंचांगानुसार, यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी होणार असून 31 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून 52 मिनिटांनी संपणार आहे. अशातच नरक चतुर्दशी येत्या 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. यम देवतेची पूजा करण्यासह घरात तूपाचा दिवा लावला जातो. यावेळी काही खास गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

नरक चतुर्दशीला करा हे काम

  • नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा.
  • नरक चतुर्दशीला यमाच्या नावाच दिवा लावण्यासह त्याची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते.
  • या दिवशी अंगाला तेलाने मसाज करुन आंघोळ करा. असे म्हटले जाते की, चतुर्थीच्या दिवशी तेलात लक्ष्मी निवास करते. यामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होते.
  • नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
  • नरक चतुर्दशीला 14 दिवे लावून घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे.

नरक चतुर्दशीला काय करू नये?

  • नरक चतुर्दशीला यमराजची पूजा केली जाते. यामुळे या दिवशी कोणत्याही पशूला नुकसान पोहचवू नये.
  • या दिवशी घराची दक्षिण दिशा अस्वच्छ ठेवू नये.
  • नरक चतुर्दशीला तेलाचे दान करु नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
  • मांसाहार करणे टाळावे.
  • नरक चतुर्दशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Dhanteras 2024 : दिवाळीआधी धनत्रयोदशी का साजरी करतात? वाचा योग्य तारीख आणि कथा

दिवाळीत दिसेल सौभाग्यवतीचा लूक, नेसा Genelia Deshmukh सारख्या 8 साड्या

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स