
Dhanteras 2024 : दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी…असा हा दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी किंवा दीपावली. दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनतेरस का साजरी केली जाते, पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
धनतेरस कथा
हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार शरद ऋतूतील पौर्णिमेचा चंद्र, कार्तिक द्वादशीच्या दिवशी कामधेनू गाय, कार्तिक महिन्यातील कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवीचे कुलदैवत, अत्यंत मौल्यवान आणि मौल्यवान नसलेले अशा अनेक गोष्टी समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आल्या. कार्तिक महिन्यातील अमावास्येला महासागरातून माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तो दिवस त्रयोदशीचा म्हणून धनत्रयोदशी साजरी केली जाते. जी दिवाळीच्या दोन दिवस आधी येते. या दिवशी धन्वतंरी देवाची पूजा केली जाते. तसंच या निमित्ताने एकमेकांना आवर्जून धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिल्या जातात. याला धनतेरस असेही म्हटले जाते.
धनतेरस महत्व
धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. या सणामध्ये यमापासून संरक्षण व्हावे आणि उत्तम आरोग्य व समृद्धी मिळावी म्हणून लोक धन्वंतरी देवी म्हणजेच लक्ष्मी आणि मृत्यूची देवता यम यांची पूजा करतात. या दिवशी लोक त्यांची घरे आणि कार्यालये ही सजवतात. पारंपारिकपणे घराचे प्रवेशद्वार सजवण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोरणे केली जातात. दारासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. लक्ष्मीच्या लहान पावलांचे ठसे तांदळाच्या पिठापासून आणि सिंदूरापासून काढले जातात. जे देवी लक्ष्मीच्या बहुप्रतिक्षित आगमनाचे प्रतीक आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूपासून बनवलेल्या वस्तू, नवीन भांडी किंवा नाणी खरेदी करणे खूप लोकप्रिय आहे कारण ते शुभ मानले जाते आणि आपल्या कुटुंबात आनंद, समृद्धी आणि कल्याण आणते.
धनत्रयोदशी पुजा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांनी सुरु होणार असून 30 ऑक्टोबला दुपारी 01 वाजून 16 मिनिटांनी संपणार आहे.
धनतेरसला खरेदी करा या वस्तू
धार्मिक मान्यतेनुसार, धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात समृद्धी येते. याशिवाय सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. धनतेरसच्या दिवशी भांडी आणि सोने-चांदी खरेदी देखील केली जाते. याशिवाय प्रॉपर्टी, वाहन खरेदी करणेही शुभ मानले जाते.
आणखी वाचा :
कोजागिरी पौर्णिमेला चमकणार या 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब
दिवाळीसाठी परफेक्ट आहेत Shriya Saran सारख्या या 8 साड्या, खुलेल लूक