Ganesh Chaturthi 2024 : केवळ 500 रुपयांत करा बाप्पाची आरास, पाहा DIY डेकोरेशन

Ganesh Chaturthi 2024 :  यंदा गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबरला पासून सुरु होणार आहे. अशातच सध्या मार्केटमध्ये गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन डिझाइन पहायला मिळत आहे. पण अवघ्या 500 रुपयांत डेकोरेशन कसे करावे याबद्दलचे खास व्हिडीओ पाहूया.

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असणारा गणेशोत्सवाच्या सणाची प्रत्येकाकडून वाट पाहिली जाते. कोकणात बहुतांशजण गणपतीला जातात. खरंतर, कोकणात गणपतीच्या सणाची मोठी धूम पहायला मिळते. तर शहरांमध्येही घरोघरी अथवा सार्वजनिक मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते. यंदाचा गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अशातच गणपतीसाठी डेकोरेशन काय करायचे याबद्दलच्या वेगवेगळ्या आयडिया सोशल मीडियावर सर्च केल्या जातात. आज आपण अवघ्या 500 रुपयांत घरगुती गणपतीसाठी डेकोरेशन कसे करायचे हे पाहणार आहोत. 

 

 

गणेशोत्सव तारीख
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा भाद्रपत महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनी सुरु होणार आहे. ही तिथी 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपणार आहे. अशातच उदयातिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थीची सुरुवात 7 सप्टेंबर शनिवारपासून होणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना आणि व्रत ठेवले जाणार आहे.

शुभ मुहूर्त
7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या पुजेचा शुभ मुहूर्त 2 तास 31 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा 11 वाजून 03 मिनिटांनी करू शकता. मुहूर्त दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी पूर्ण होणार आहे.

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : जापानसह या पाश्चिमात्य देशांमध्ये केली जाते गणपतीची पूजा

Ganesh Chaturthi 2024 : मुंबईत गणेशोत्सवाची धूम, पाहा बाप्पाच्या आगमनाचे PHOTOS

Read more Articles on
Share this article