श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यानंतर बहुतांशजण मांसाहार करणे टाळतात. यामागे धार्मिक कारण असण्यासह वैज्ञानिक कारण देखील आहे.
श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच बहुतांशजण श्रावणात नॉन-व्हेज खाणे टाळतात. यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे.
श्रावणात पडणाऱ्या पावसामुळे हवेत दमटपणा वाढल्याने फंगल इन्फेक्शनसारख्या समस्या वाढू शकतात. नॉन-व्हेज पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यास वेळ लागतो. यामुळेच नॉन-व्हेज खाणे बहुतांशजण टाळतात.
श्रावणानंतर पुन्हा एकदा नॉन-व्हेज खाण्यास सुरुवात करणार असल्यास पुढील काही गोष्टींची काळजी घ्या. अन्यथा आरोग्याला नुकसान पोहोचू शकते.
श्रावणानंतर नॉन-व्हेजचे सेवन करू शकता. पण एका महिन्यानंतर नॉन-व्हेज खाणार असल्यास खाल्ल्यानंतर पोट जड झाल्यासारखे वाटू शकते.
दीर्घकाळानंतर नॉन-व्हेज खात असल्यास हलक्या पदार्थांपासून सुरुवात करा. सर्वप्रथम अंडी, मासे अखथा पोल्ट्रीसारखे पदार्थ खा.
श्रावणानंतर पहिल्यांदाच मांसाहार करणार असल्यास मर्यादित प्रमाणात करा. यामुळे पोट दुखी किंवा अॅसिडिटीची समस्या उद्भवणार नाही.
नॉन-व्हेज खाताना अत्याधिक प्रमाणात तिखट नसावे. यामुळे पोट बिघडण्याची शक्यता वाढली जाऊ शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.