'डेथ कॅप' ही जगातील सर्वात विषारी अळंबी (मशरूम) आहे. दिसायला अगदी साधी वाटणारी ही अळंबी माणसाचा जीव कशी घेते, तिचे विष शरीरावर कसा हल्ला करते आणि तिचा एक छोटा तुकडाही कसा जीवघेणा ठरतो, हे आपण जाणून घेणार आहोत.
ही अळंबी आपण बाजारातून आणतो, अगदी तशीच दिसते. पण प्रत्यक्षात ती जगातील सर्वात जीवघेणी अळंबी आहे. तज्ज्ञ याला 'डेथ कॅप' मशरूम म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव 'अमानिटा फॅलॉइड्स' (Amanita phalloides) आहे.
जगभरात मशरूमच्या विषबाधेमुळे जेवढे मृत्यू होतात, त्यापैकी ९० टक्के मृत्यू याच अळंबीमुळे होतात. तुम्ही या फिकट पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या अळंबीला उकळले, तळले किंवा वाळवले, तरी तिचे विष अजिबात नष्ट होत नाही.
या मशरूमचा अर्धा तुकडाही माणसाचा जीव सहज घेऊ शकतो.
23
कसा मृत्यू होतो?
एखादी व्यक्ती जेव्हा 'डेथ कॅप' मशरूम खाते, तेव्हा तिच्या शरीरात लगेच भयंकर बदल दिसू लागतात. या अळंबीतील धोकादायक 'अॅमॅटॉक्सिन' विष पेशींचे काम वेगाने थांबवते. हे मशरूम खाल्ल्यानंतर सहा ते बारा तासांत रुग्णाच्या पोटात तीव्र वेदना होतात, उलट्या आणि जुलाब सुरू होतात. शरीरातील संपूर्ण ताकद निघून जाते. दुसऱ्या दिवशी उलट्या थांबतात आणि रुग्णाला आपण बरे होत आहोत असे वाटते. पण हे विष शरीरात शांतपणे पसरते आणि यकृत (लिव्हर) तसेच किडनीच्या पेशी पूर्णपणे नष्ट करते.
33
जगात आढळणारा मशरूम
शेवटच्या टप्प्यात रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होते. त्याचे यकृत आणि किडनी पूर्णपणे काम करणे थांबवतात. कोमात जाण्यापूर्वी रुग्णाला कावीळ होते आणि शरीराच्या आत रक्तस्राव सुरू होतो. तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास अवयव निकामी होऊन रुग्णाचा मृत्यू निश्चित असतो. हे 'डेथ कॅप' मशरूम जंगलात झाडांच्या मुळांजवळ नैसर्गिकरीत्या वाढतात आणि ते खाण्यायोग्य मशरूमसारखेच दिसतात. त्यामुळे तज्ज्ञ असा कडक इशारा देतात की, जंगलातील कोणत्याही अनोळखी मशरूमला हात लावू नका किंवा ते तोडू नका.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.