तुम्ही रेस्टॉरंटमध्ये मशरुम पास्ता खाल्ला असेल. पण हीच रेसिपी घरी तयार करायची असल्यास त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढे पाहूया सविस्तर...
1 कप पास्ता, 200 ग्रॅम मशरुम, अर्धा कप दूध, अर्धा कप चीज, तीन चमचे बटर, कांदा बारीक चिरलेला, मैदा, लसूण पेस्ट, काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम पास्ता गरम पाण्यामध्ये उकळवून घ्या. यावेळी पाण्यात थोडे मीठ आणि तेल घाला. जेणेकरुन पास्ता व्यवस्थितीत शिजला जाईल.
पास्ता शिजल्यानंतर गाळून एका भांड्यात काढून ठेवा. आता चीजही बारीक किसून घेत एका प्लेटमध्ये काढा.
एका पॅनमध्ये बटर गरम करुन त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
मशरुम लहान आकारामध्ये कापून घ्या आणि कांद्यात परतून घ्या. 2-3 मिनिटांनी मैदाही घाला.
सर्व सामग्री भाजून घेतल्यानंतर दूध घाला. यामध्ये लसूण पेस्ट, मीठ, काळीमिरी पावडरसह किसलेले चीज घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
मिश्रणात शिजवलेला पास्ता मिक्स करुन परतून घ्या. 5 मिनिटे पास्ता शिजवून घेतल्यानंतर रेस्टॉरंटसारखा क्रिमी मशरुम पास्ता तयार झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.