Expensive tea in India : चहाप्रेमींना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची चहाची पिण्यास आवडते. भारतातील दार्लिजिंग असे एक ठिकाण आहे तेथे तुम्हाला चहाचे मोठेमोठे चहाचे मळे दिसतीलच. याशिवाय दार्लिजिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घ्यायला मिळेल.
Expensive tea in India : पश्चिम बंगालमध्ये पर्वतरांगांमध्ये वसलेले दार्जिलिंग (Darjeeling) आपल्या चहाच्या मळ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथील चहाची किंमत दीड लाख रुपये प्रति किलोग्रॅम आहे. ही अत्यंत महागडी चहा चाय मॉल रोडच्या परिसरातील एका दुकानात मिळते.
दीड लाख रुपये प्रति किलोग्रॅम चहाची खासियत
दुकानाचे मालक गौतम मंडल यांनी एएनआयसोबत संवाद साधताना म्हटले की, आमच्याकडे उच्च श्रेणीतील चहा मिळते. याच्या किंमती खिशाला परवडण्यासारख्याच आहेत. पण दुर्मिळ अशी पांढऱ्या रंगातील चहा आमची खासियत आहे. या चहाचे प्रत्येक वर्षाला 15-20 किलोग्रॅमचे उत्पादन होते. सफेद चहाच्या रोपांची पाने पूर्णपणे विकसित होण्याआधीच विशेष प्रकारच्या बागेतून तोडली जातात. कारण पानांमध्ये लहान लहान कळ्या असल्याने याला पांढऱ्या रंगातील चहा म्हटले जाते. याशिवाय पांढऱ्या रंगातील चहाची चव फार वेगळी लागते.
प्रति किलोग्रॅमनुसार बदलते किंमत
गौतम मंडल यांनी चहाबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, आमच्याकडे 400 रुपये प्रति किलोग्रॅपासून चहाची सुरूवात होते. प्रत्येक चहा महागडी असते असे नाही. पांढऱ्या रंगातील चहाच्या 100 ग्रॅमचीच किंमत दीड लाख रुपये आहे.
चहाचे वेगवेगळे प्रकार
पांढऱ्या रंगातील चहाबद्दल प्रत्येकालाच सांगितले जात नाही. ज्या व्यक्ती विचारतात, परदेशात गेल्या आहेत अथवा खासकरून त्यांना पांढऱ्या रंगातील चहा हवी असल्यास तरच आम्ही दाखवतो असेही दुकानाचे मालक गौतम मंडल यांनी सांगितले. याशिवाय चहाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत. यानुसार दार्जिलिंग चहा, हिरवी चहा, ऊलोंग चहा आणि पांढऱ्या रंगातील चहा. या चारही चहाचा स्वाद वेगवेगळा असून त्या वेगळ्या पद्धतीनेच तयार केल्या जातात.
दार्जिलिंगच्या अर्थव्यवस्थेला चहामुळे चालना
दार्लिजिंगमध्ये चहाचे मळे सर्वप्रथम 1800 दशकाच्या मध्यात लावण्यात आले. येथे जवळजवळ 17,500 हेक्टर जमिनीवर चहाचे मळे विस्तारले गेले आहेत. खरंतर, चहाच्या माध्यमातून दार्जिलिंगच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळतेच. पण दार्जिलिंगच्या अर्थव्यवस्थेलाही चहामुळे हातभार लागतो.
आणखी वाचा :