तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिराविषयी जाणून घ्या या गोष्टी...

भक्त तिरुमला बालाजी मंदिराचा अध्यात्मिक प्रवास करण्यासाठी योजना आखात असतात. जे भगवान विष्णूचे अवतार भगवान व्यंकरेश्वराचे निवासस्थान आहे. तुम्ही या उन्हाळ्यात या धार्मिक स्थळाला भेट देणार असाल तर तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे.

 

Ankita Kothare | Published : Apr 25, 2024 6:36 AM IST / Updated: Apr 25 2024, 12:16 PM IST

तिरुपती शहरात प्रवेश करताच तुम्हाला तेथील धार्मिक वातावरणाचा आभास व्हायला सुरुवात होते. आपोआप प्रार्थना गुणगुणायला लागतो. श्री व्यंकटेश्वर मंदिरातून अनेक भाविक मोठ्या संख्येने श्रध्येपोटी येत असतात. आंध्र प्रदेशच्या अध्यात्मिक राजधानीतील तिरुमला टेकड्यांवर वसलेल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराचे आहे. येथे भगवान विष्णूचा अवतार असलेले वेंकटेश्वर वास करतात असे मानले जाते. मंदिर ट्रस्ट - तिरुमला तिरुपती देवस्थानम्स जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर आहे.

तिरुपती बालाजी मंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीती असणे आवश्यक आहे :

हे मंदिर स्वतःमधीलच एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट मानून आहे. अत्यंत रेखीव नक्षी काम आणि त्यावर भव्य सोन्याचा मुलामा असलेल्या घुमटाने सुशोभित केलेले हे मंदिर आहे. तिरुमलामध्ये, पूर्वाभिमुख श्री वराहस्वामी मंदिर, स्वामी पुष्करिणी मंदिर आहे. भगवान श्रीनिवासाने श्री वराहस्वामी यांच्याकडून जमीन मागितली, त्यांनी ती स्वेच्छेने मंजूर केली अशी या मंदिरामागची आख्यायिका आहे.

महाद्वाराची खासियत :

महाद्वारम नावाच्या मुख्य प्रवेशद्वाराची १३ व्या शतकापासून हळूहळू उंची वाढत गेली, आज पन्नास फुटांपर्यंत पोहोचली आहे. 'पदिवाकिली' किंवा 'सिहद्वारम' म्हणूनही ओळखले जाते. यात भगवान श्री वेंकटेश्वराच्या खजिन्याचे रक्षक करत असलेल्या सांकनिधी आणि पद्मनिधी यांच्या मूर्ती आहेत.तसेच भव्य सोन्याच्या मुलामा असलेल्या घुमटाखाली व्यंकटेश्वराची मूर्ती आहे.

तिरुपती मंदिराचा विशेष प्रसाद :

तिरुपती बालाजी मंदिरात लाडूचा प्रसाद म्हणून दिला जातो. तसेच या प्रसादाचे संपूर्ण अधिकार देवस्थानाकडे राखीव आहेत. फक्त तिरुमाला तिरुपती देवस्थानम ते उत्पादन आणि विक्री करण्यास परवानगी देते. याव्यतिरिक्त, वेंकटेश्वराला चक्रापोंगल, पुलिहोरा, मिर्याला पोंगल, कदमभम आणि दादोजनम यासारखे इतर विविध प्रसाद दिले जातात. पण्याराम प्रसादामध्ये लाडू,वडा,डोसा,अप्पम,जिलेबी,मुरुकू,पोळी आणि पायसम यांचा समावेश होतो.

तिरुपतीमध्ये केस दान करण्याची प्रथा :

या मंदिरातील सर्वात अनोख्या विधींपैकी एक म्हणजे केस दान करणे. बरेच भक्त त्यांचे सर्व केस "मोक्कू" किंवा मंदिरात अर्पण म्हणून दान करतात, यातून दररोज जवळजवळ एक टन केस लोक अर्पण करतात.

हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर का आहे?

दररोज हजारो भाविक मंदिराला लाखोंची रोकड, सोने, जमीन अर्पण करतात. "हुंडी" किंवा दानपेटीत पैसे दान करण्याच्या या विधीबद्दल एक मनोरंजक आख्यायिका आहे. पुराणात असे म्हटले आहे की वेंकटेश्वराने पद्मावतीशी लग्न करण्यासाठी कुबेरकडून सुमारे 11.4 दशलक्ष सोन्याची नाणी उधार घेतली होती, त्या पैशाचा वापर करून विश्वकर्माला त्याचे भव्य निवासस्थान बांधण्यासाठी दिले होते. वेंकटेश्वर कुबेरची परतफेड करतील असा विश्वास म्हणून भक्त मंदिरात सोने, पैसा आणि इतर वस्तू दान करतात. अहवालानुसार तिरुपती मंदिराला दररोज देणगी 22.5 दशलक्ष रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

गर्दी टाळण्यासाठी दर्शन कसे बुक करावे :

सीघरा दर्शनः विशेष प्रवेश दर्शन हा भक्तांचा वेळ कमी करण्यासाठी सशुल्क दर्शनाच पर्याय आहे. तिकीट खरेदी करून, मोफत दर्शन रांगेच्या तुलनेत भाविकांना जलद दर्शनाचा अनुभव घेता येईल.

सर्व दर्शनः सर्व दर्शन ही सर्व भक्तांसाठी मोफत उपलब्ध असलेली सर्वसाधारण रांग आहे. हे दर्शनाचा सर्वात सामान्य आणि लोकप्रिय प्रकार आहे. वेंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक कित्येक तास, कधी कधी रात्रभर रांगेत उभे असतात.या दर्शनांची तिकिटे भारतभरातील टीटीडी काउंटरवर उपलब्ध आहेत आणि ती ऑनलाइनही सोयीस्करपणे बुक करता येतात. दर्शनासाठी लागणारा वेळ, वैकुंटम रांग कॉम्प्लेक्समधील रांगेत प्रवेश करण्यापासून ते भगवान व्यंकटाची मूर्ती असलेल्या गर्भगृहापर्यंत पोहोचण्यापर्यंत, मंदिराला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार, साधारणपणे 3 ते 10 तास किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. दीर्घ प्रतीक्षा टाळण्यासाठी, किमान एक महिना अगोदर आपले दर्शन बुक करण्याचा विचार करा.

Share this article