काही फळं उपाशी पोटी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
उपाशी पोट केळ खाल्ल्याने पोटात गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. केळ खाण्याआधी काहीतरी थोडेसे खावे.
उपाशी पोटी कधीच कलिंगडाचे सेवन करू नये. यामुळे उलटी आणि पोटात गॅस होण्याची शक्यता वाढली जाते.
उपाशी पोटी डाळिंबाचे सेवन केल्याने फ्रेश वाटते. पण भूक वाढली जाते आणि पोटात गॅस निर्माण होऊ शकतो.
लिंबाचा रस उपाशी पोटी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे काही खाल्ल्यानंतरच लिंबू पाणी प्या.
उपाशी पोटी पपई खाल्ल्याने गॅस आणि पोटात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
संत्र्यामुळे अॅसिडीटी आणि पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे उपाशी पोटी कधीच संत्र्याचे सेवन करू नका.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.