Lifestyle

भोपळ्याच्या बियांचे सेवन करता? जाणून घ्या योग्य पद्धत

Image credits: Freepik

आरोग्यासाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम, अँटी-ऑक्सिडेंट्स, जस्त असे गुणधर्म असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. याशिवाय गुडघे दुखीचा त्रास असल्यासही भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.

Image credits: Getty

भोपळ्याच्या बियांचे सेवन करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम भोपळ्याच्या बिया स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर भाजा. असे केल्यानंतरच तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता. 

Image credits: Getty

उपाशी पोटी सेवन करा

दररोज सकाळी उपाशी पोटी भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरिराला पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात. भोपळ्याच्या बिया प्रोटीनचा उत्तम स्रोतही मानल्या जातात.

Image credits: Freepik

शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते

भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कमी होते.

Image credits: Social Media

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे ब्लड शुगरचा स्तर कमी राहतो.

Image credits: Freepik

हाडांसाठी उत्तम

भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शिअम गुणधर्म असल्याने हाडांना बळकटी मिळते. याशिवाय हाडांसंबंधित समस्याही दूर राहतात.

Image credits: Freepik

केसगळतीवरही फायदेशीर

भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केसगळतीच्या समस्येपासून दूर राहू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि खनिजे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.

Image credits: Freepik

Disclaimer :

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik