मुंबई - सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या राशींसाठी आर्थिक चढउतार पाहायला मिळतील. काही राशींना आर्थिक लाभ आणि सुखाची वाढ होण्याची शक्यता असताना, इतरांना वाढता खर्च आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं आहे.
तुम्ही एखादी बहुप्रतिक्षित वस्तू खरेदी करू शकता. रागात कोणताही निर्णय घेणं टाळा, नाहीतर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.
212
वृषभ:
कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश आणि पैसा मिळेल. महिन्याच्या मध्यावर थोडा दिलासा मिळू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात, अचानक मोठ्या खर्चाने तुमचं बजेट बिघडू शकतं, अशा परिस्थितीत पैशाचं व्यवस्थापन योग्य रीतीने करणं आवश्यक आहे.
312
मिथुन:
तुम्हाला आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुखाची वाढ पाहायला मिळेल. महिन्याच्या मध्यावर, तुम्ही घाईघाईने किंवा भावनिक होऊन कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं.
कर्क राशीच्या लोकांनी सप्टेंबरमध्ये मोठ्या बदलांसाठी तयार राहावं. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत धाडसाने पुढे जाल आणि विजयी व्हाल.
512
सिंह:
सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना यशस्वी ठरेल. या महिन्यात बढती आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. तुम्हाला असं वाटेल की लोक तुमचं ऐकत नाहीयेत.
612
कन्या:
कन्या राशीच्या लोकांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला येणारी संधी गमावू नये, नाहीतर पुन्हा ती मिळवण्यासाठी त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
712
तूळ:
तुमचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. तसंच, अनावश्यक धावपळ आणि नको तेवढा खर्च वाढेल. महिन्याच्या मध्यावर थोडा दिलासा मिळेल.
812
वृश्चिक:
आज, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ग्रहांची युती होत आहे आणि तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होईल. तुम्ही आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असाल. तुम्ही धाडसाने जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.
912
धनू:
धनू राशीच्या लोकांना अचानक काही मोठे खर्च करावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
1012
मकर:
छोट्या-मोठ्या प्रत्येक समस्येवर तुम्ही सहजपणे मात कराल. सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून तुम्ही तुमचं इच्छित यश आणि संपत्ती मिळवाल. साठवलेली संपत्ती वाढू शकते.
1112
कुंभ:
विलासितेची एखादी बहुप्रतिक्षित वस्तू खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. कमिशन आणि लक्ष्यावर आधारित कामासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. वादाऐवजी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करा, अन्यथा विद्यमान संबंध बिघडू शकतात.
1212
मीन:
मीन राशीच्या लोकांनी आज त्यांचे पैसे आणि वेळ खूप विचारपूर्वक खर्च करावेत, अन्यथा त्यांना चिंतेला सामोरं जावं लागू शकतं.