'बात होगी जंगल के भौकाल की...', Mirzapur च्या तिसऱ्या सीझनचा अखेर टीझर प्रदर्शित (Watch Video)

Published : Jun 11, 2024, 03:40 PM ISTUpdated : Jun 12, 2024, 01:49 PM IST
Mirzapur 3 Teaser Out

सार

पंकज त्रिपाठी यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनचा अखेर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सीरिजचा टीझर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.

Mirzapur Season 3 Teaser : पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या मिर्झापूर-3 चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइमवर वेब सीरिज कधीपासून पाहायला मिळणार याची तारीखही जाहीर केली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने इंस्टाग्रामवर वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित करत म्हटले आहे की, "भौकाल मचने वाला है। #MirzapurOnPrime वर पाहा 5 जुलैपासून." वेब सीरिजचा टीझर अंगावर काटा आणणारा आहे. वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझननंतर तिसऱ्या सीझनची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात होती. अशातच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.

मिर्झापुरच्या तिसऱ्या टीझरमध्ये नक्की काय आहे?
मिर्झापुर-3 च्या टीझरच्या सुरुवातीला जंगलाचा राजा सिंहचे दृष्ट दाखवण्यात आले आहे. बॅकग्राउंडला कुलभूषण खरबंदा यांचा आवाज येतोय. यानंतर एकामागोमाग अशा सर्व सस्टारच धमाकेदार एण्ट्री होताना दिसून येत आहेत. टीझरमध्ये वेब सीरिजमधील प्रत्येक पात्राचा खास परिचयही करुन दिला आहे. अशातच अखेरीस वाड्यातील दृष दाखवत ‘बात होगी जंगल के भौकाल की...’म्हणत टीझरचा शेवट केला आहे.

5 जुलैला प्रदर्शित होणार Mirzapur 3
एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटद्वारे प्रोड्यूस करण्यात आलेली क्राइम-थ्रिलर सीरिज मिर्झापूरचे दोन्हीही सीझन प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडले. आता तिसरा सीझन धुमाकूळ घालण्यास तयार आहे. याचे दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, रशिका दुग्गल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, हर्षिता शेखर गौड, अंजुम शर्मा, ईशा तलवार, मेघना मलिकसारखे काही कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. वेब सीरिजचे 10 एपिसोड प्रेक्षकांना येत्या 5 जुलैपासून पाहायला मिळणार आहेत.

आणखी वाचा :

Kalki 2898 AD सिनेमातील 9 प्रमुख कलाकार, ओखळणेही होतेय मुश्किल

Kalki 2898 AD सिनेमा हिट होणार की फ्लॉप? वाचा 600 कोटींच्या फिल्मचा Review

PREV

Recommended Stories

पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!
iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!