चपाती थंड झाल्यावर कडक आणि वातड होण्यामागे पीठ मळण्यापासून ते चपाती डब्यात ठेवण्यापर्यंतच्या चार सामान्य चुका कारणीभूत असतात. कोमट पाण्याचा वापर, पीठ मुरू देणे आणि योग्य आचेवर चपाती भाजल्यास ती बराच काळ मऊ राहते, असा सल्ला मास्टरशेफने दिला आहे.
अनेकदा चपात्या बनवून ठेवल्या की काही तासांतच थंड झाल्यावर वातड आणि कडक होतात. असं का होतं माहित आहे का? मास्टरशेफ मोबासिर हसन यांच्या मते, यामागे आपण करत असलेल्या चार सामान्य चुका आहेत.
26
पीठ व्यवस्थितीत न मळणे
चला तर मग पाहूया त्या चार चुका कोणत्या आहेत. याची सुरुवात पीठ मळण्यापासूनच होते. पण गंमत म्हणजे, या चुका इतक्या सामान्य आहेत की त्या आपल्या लक्षातही येत नाहीत.
36
थंड पाणी वापरणे
पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पीठ मळण्यासाठी थंड पाणी वापरणं. मास्टरशेफ मोबासिर हसन सांगतात की, पीठ थंड पाण्याने नाही, तर कोमट पाण्याने मळावं. यामुळे पिठातील मॉइश्चर टिकून राहतं आणि चपात्या जास्त वेळ मऊ राहतात.
दुसरी चूक म्हणजे पीठ मळल्याबरोबर लगेच चपात्या लाटायला घेणं. हे चुकीचं आहे. पीठ मळल्यानंतर किमान १५ मिनिटं त्याला झाकून ठेवा. त्यावर एखादं सुती कापड झाकल्यास चपात्या अधिक काळ मऊ राहतील.
56
मंद आचेवर भाजणे
तिसरी चूक म्हणजे चपाती खूप कमी आचेवर भाजणे. असं केल्यामुळे चपातीमधील पाण्याचा अंश हळूहळू नाहीसा होतो आणि ती कडक बनते. त्यामुळे चपाती नेहमी मध्यम ते हाय फ्लेमवरच भाजावी.
66
चपाती भाजल्यानंतर लगेच डब्यात भरून ठेवणे
शेवटची चूक म्हणजे चपाती थेट डब्यात ठेवणं. असं करू नये. त्याऐवजी, डब्यात एक सुती कापड ठेवून त्यावर चपात्या ठेवा आणि मग डबा बंद करा, असा सल्ला मास्टरशेफ देतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.