Maharashtra Day 2024 : 1 मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या खास गोष्टी

Maharashtra Day 2024 : 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये बनवण्यात आली. यामुळेच महाराष्ट्रासह गुजरातमध्येही राज्याच्या स्थापनेचा दिवस 1 मे आहे. 

Maharashtra Day 2024 : प्रत्येक वर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र दिवसाचा इतिहास फार मोठा आहे. अशातच महाराष्ट्र दिवस साजरा करण्यामागील कारण, इतिहास आणि महत्त्व याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....

स्वातंत्र्यानंतर राज्यांची निर्मिती
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्य पुर्नगठन अधिनियम, 1956 अंतर्गत वेगवेगळी राज्ये तयार झाली. राज्य किंवा त्या क्षेत्रातील बोली भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झालीय. पण काही राज्यांमध्ये एक वेगळीच समस्या निर्माण झाली आणि मुंबईही त्यापैकी एक आहे.

संयुक्त महाराष्ट्र समितीचे गठन
खरंतर, वर्ष 1960 रोजी एका बाजूला गुजरात राज्याची बनण्यासाठी महागुजरात आंदोलन सुरू झाले होते. दुसऱ्या बाजूला महागुजरात आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत होता. पण मराठ्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती गठन केली. 1 मे, 1960 रोजी भारत सरकारने बॉम्बेला दोन राज्यांमध्ये विभागले. महाराष्ट्र राज्य मराठी भाषिक आणि गुजरात गुजराती भाषिकांसाठी बनवण्यात आले.

महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी भाषिक
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना झाल्यानंतर मुंबईत एक नवा वाद निर्माण झाला. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक होती. यामुळे मुंबईला महाराष्ट्राकडे द्यावे अशी मागणी केली गेलीय. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या विकासासाठी गुजराती भाषिकांचा मोठा वाटा असल्याने मुंबई गुजरातला द्यावी. यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.

या कारणास्तव साजरा केला जातो महाराष्ट्र दिन
मुंबईमध्ये मराठी, कोकणी, गुजराती आणि कच्छी भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक होती. यामुळे राज्याची व्यवस्था गठन केल्यानंतर असा प्रश्न उपस्थितीत झाला की, मुंबई महाराष्ट्राची होती की गुजरातमधील तत्कालीन शासकांकडे आली होती. यामुळे मराठी भाषिकांनी मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी मोठा संघर्ष केला. यामध्ये 106 शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यामुळेच मुंबईला महाराष्ट्राच्या राजधानीचा दर्जा मिळाला आणि मुंबई महाराष्ट्राची झाली. त्या दिवशी तारीख 1 मे, 1960 होती. अशातच 1 मे रोजी प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

आणखी वाचा : 

लग्न समारंभ असो वा पार्टी,या कांजीवरम साड्यांमध्ये दिसाल दीपिकासारखे

Mahavir Jayanti :भगवान महावीरांचे हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का ?

 

Share this article