या संपूर्ण सोनेरी जरी काम केलेल्या लाल रंगाच्या साडीत दीपिका जशी कमाल दिसत आहे. तसाच तुम्ही कमाल लुक करू शकता. यामध्ये रंग तुमच्या आवडीने देखील घेऊ शकता.
लाल रंगाच्या बनारसी साडीत दीपिका पारंपारिक लुक देत आहे. या प्रकारची साडी कधीही कोणत्याही प्रसंगी नेसता येते. जेव्हा तुम्ही अशी साडी ट्राय कराल तेव्हा एकदम खुलून दिसाल.
जरीच्या वर्कने सजलेल्या ब्राऊन रंगाच्या बनारसी साडीत दीपिका राणीपेक्षा कमी दिसत नाही.तुम्ही देखील असाच पारंपरिक लुक ट्राय करून तिचा सारखे राणी दिसाल.
सध्या तरुणींना हलकी आणि पटकन नेसता येणारी साडी जास्त आवडते. त्यामुळे दीपिका सारखी अशी हलकीफुलकी साडी तुम्ही ट्राय कराल तेव्हा एखाद्या राजकन्येप्रमाणे दिसाल.
हिरव्या रंगाच्या बनारसी साडीची बॉर्डर सोनेरी रंगात दिली आहे. गोऱ्या आणि उंच मुली अशा प्रकारची साडी नेसून बाहेर पडल्यास सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळतील.
दीपिकाने लाल रंगाच्या कांजीवरम साडीसोबत हेवी ज्वेलरी वेअर केली आहे.तुम्ही सिल्क किंवा कांजीवरम साडी नेसल्यास तुम्ही देखील हेवी ज्वेलरी ट्राय करू शकता.
दीपिकाने साध्या सोनेरी कांजीवरम साडीसह हिरव्या रंगाचे चोकर आणि कानातले घातले आहेत.असाच पारंपरिक लुक ट्राय करून तिचा सारखे राणी दिसाल.